सिनेच्या पुरात जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या भोई समाज कार्यकर्त्यांचा गणेश चिवटेकडून सन्मान

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा (प्रतिनिधी) :सीना नदीला आलेल्या महापूरामुळे करमाळा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असताना शेकडो नागरिकांचे जीव संकटात आले. अशा भीषण परिस्थितीत मौजे बोरगाव व निलज येथील भोई समाजातील कार्यकर्ते भारत भोई, शाम भोई, प्रमोद भोई, अविनाश भोई, साहेबराव भोई, सचिन भोई, दादा भोई, अतिश भोई, आदी जणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सीना नदीच्या पुराच्या पाण्यात उतरून बोरगाव, निलज व पोटेगाव येथील शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलविले.माणसाबरोबच त्यांनी ६म्हशी व २गाई त्यांनी सुरक्षित वाचवल्या.त्यांच्या या धाडसी आणि समाजहिताच्या कार्याचा गौरव करमाळा तालुका भाजपाच्या वतीने करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते भोई समाज कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.चिवटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आपत्तीच्या काळात जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणे ही खरी मानवसेवा आहे. भोई समाज कार्यकर्त्यांनी दाखवलेले धाडस आणि सामाजिक जाणीव ही संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. भाजप पक्षाला अशा कार्यकर्त्यांचा अभिमान आहे तसेच भोई समाजाला भविष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीत आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत” या सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन भाजपा सरचिटणीस नितीन झिंजाडे यांनी केले यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव,सोमनाथ घाडगे,किरण बागल,अमोल पवार, बंडू शिंदे, गणेश महाडिक, सुनिल विटकर आदी करमाळा तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     आम्ही लोकांना मदत करून लोकांचे व जनावरांचे जीव आमची जबाबदारी म्हणून वाचवले. पण या सीना नदीच्या महापुरात आमच्या ६ नावा,मासे पकडाच्या जाळ्या व पिंजरे वाहून गेले आहेत.आमच्या राहत्या घरात पाणी घुसले आहे यामुळे घराचेही मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावी व आम्हाला तात्काळ मदत करावी कारण आमचे जीवनामन या नावा, जाळ्या व पिंजरे यावर अवलंबून आहे.
@भारत भोई...(मच्छिमार बोरगाव)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल