आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

करमाळा तालुक्यातील सभासद मायबाप जनतेला जाहीर आवाहन आहे की करमाळा तालुक्यातील आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीची सध्या रणधुमाळी चालू आहे आणि प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत कित्येक दिवस झालं बंद असलेला आदिनाथ कारखाना चालू करायचा असेल तर सभासद वर्ग व शेतकरी राजाने शांत डोक्याने विचार करावा कोणत्याच गटातटाच्या प्रेमात पडू नये. करमाळा तालुक्यातील सर्वच गटातील जगताप,बागल,पाटील,शिंदे व झोळ गटातील सर्व सभासद वर्गाने विचार करून आपला मतदान रुपी आशीर्वाद कुणाच्या पारड्यात टाकायचे याचा विचार मायबाप,मतदार राजाने जरूर करावा. ही निवडणूक म्हणजे कारखाना वाचवण्यासाठी शेवटची संधी सभासदांना असेल. कित्येक दिवस बंद असलेला कारखाना तालुक्यातील प्रमुख तीनही गटाकडे हा होता पण चांगल्या पद्धतीने चालवला गेला नाही.सभासदांनी शांत डोक्याने विचार करून निर्णय घ्यावा.भविष्यातील शेतकरी व कामगारांच्या व्यथा जाणून घेणाऱ्या गटाकडे नक्कीच हा कारखाना द्या."अभी नही तो कभी नही" असं म्हणत ही शेवटची संधी आपल्यालाच मतदान करा असं जे सांगत आहेत त्यांनीच आपला स्वाभिमान अकलूजला नेऊन ठेवलाय, तेच आता आपल्या तालुक्यातील गट आता आपसात मिळून हा कारखाना आपल्याच तालुक्यात राहू द्या अशी साद मतदारांना घालत आहे.तरी आपण विनम्रपणे विचार करून जो व्यक्ती कारखाना चांगल्या पद्धतीने चालवेल व ज्याच्याकडे चालविण्याचे व्हिजन आहे त्याच्याकडे कारखाना द्यावा.तालुक्याच हित बघा किती दिवस आपण प्रत्येक इलेक्शनला स्वाभिमानाच्या गोष्टी ऐकणार,स्वाभिमानाच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांनाच स्वाभिमान राहिला नाही.शेवटी तालुक्यातील सुज्ञ सभासदांचा कौल सर्वांनाच मान्य असेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल