"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा प्रतिनिधी :-आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचली असून या निवडणुकीमध्ये लढाईपूर्वीच महाबिघाडी पाहायला मिळाली.त्यामुळे धाबे दणाणलेल्या महाविकास आघाडीचे केम गटातील उमेदवार आमदार नारायण पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे याच गटातून माजी आमदार संजयमामा शिंदे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नारायण पाटील यांनी केम ऊस उत्पादक गट व भटक्या विमुक्त जाती जमाती या दोन गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता.आमदार संजयमामा शिंदे यांनी फक्त केम या ऊस उत्पादक गटातूनच अर्ज दाखल केलेला होता.माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बलाढ्य आव्हान, महायुतीची वज्रमुठ व बिघाडीमुळे त्रासलेल्या महाविकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांनी लढण्यापूर्वीच तलवार म्यान करून शरणागती पत्कारल्यामुळे महायुती आदिनाथ बचाव पॅनल निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणार असा ठाम विश्वास सभासद व्यक्त करत आहेत.
         आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला फक्त संजयमामा शिंदे हेच गत वैभव प्राप्त करून देऊ शकतात असा ठाम विश्वास संजयमामा शिंदे यांच्या महायुतीबरोबरच महाविकास आघाडीतील सभासदांनाही वाटत आहे .कारण सरकारच्या सहकार्याशिवाय हा कारखाना सुरू होणे शक्यच नाही. माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी महायुतीची वज्रमुठ बांधल्यामुळे राज्य सरकार व केंद्र सरकारकडून या कारखान्याला मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होऊन कारखाना ऊर्जेत अवस्थेमध्ये येऊ शकतो याची खात्री सभासदांना आहे. याउलट विधानसभेच्या वेळेस एकसंघ असलेली महाविकास आघाडी मध्ये महा बिघाडी पाहायला मिळत आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी निवडणुकीतून घेतलेली माघार,युवा नेते शंभूराजे जगताप यांच्या वरती दाखल झालेला गुन्हा यामुळे जगताप गटात पसरलेली नाराजी, आदिनाथ चा जुना हिशोब चुकता करण्यासाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे विश्वासू सुभाष आबा गुळवे हे जाहीरपणे माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे सोबत आजपासून (दि.३) प्रचारात दिसणार आहेत आदी कारणामुळे महाविकास आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल