मा.आ.संजयमामा शिंदे यांनी केली सीना नदी काठची पाहणी...विस्थापित पुरग्रस्थांनां केले ब्लॅंकेट वाटप
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा -(स्था.प्र.) अहमदनगर जिल्ह्यातील पुराचे पाणी व करमाळा तालुक्यात सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे सीना नदीकाठच्या गावांना पुराचा तडाखा बसला.8 दिवसात 3 वेळा संगोबा पुलावर पाणी आल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळित झाले.सीना नदीकाठ परिसरात पावसाने उडवलेल्या या हाहाकाराची पाहणी करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आज कार्यकर्त्यांसमवेत केली.सकाळी मांगी तलावाच्या सांडव्यातील पाणी शेतात उलटल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. खडकी व तरटगाव येथील सीना नदी पात्रातील बंधाऱ्यांचे झालेली तुटफूट व नदीपात्रातून पाणी उलटून शेतकऱ्यांचे झालेले पीक नुकसान यांची पाहणीही त्यांनी केली.खडकी, बिटरगाव श्री ,तरटगाव, संगोबा, बोरगाव,आळजापूर ,फिसरे,आवाटी येथील शेती नुकसानीची व संगोबा बंधार्याची पाहणी ही त्यांनी केली.सीना नदी काठावरील महत्त्वाचे बंधारे फुटलेले आहेत त्यामुळे पोटेगाव येथील बंधारा पूर परिस्थिती ओसरल्यानंतर तात्काळ पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे त्यांनी यावेळी सांगितले.
ही पाहणी करत असतानाच आनंदी मंगल कार्यालय पोथरे ,महामुनी मंगल कार्यालय करमाळा, आवाटी येथील दर्गा व विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेऊन त्यांना तात्काळ काय मदतीची आवश्यकता आहे याबाबत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे विचारणा केली. संबंधित विस्थापित नागरिकांना पांघरण्यासाठी ब्लॅंकेट ची आवश्यकता असल्याची मागणी तहसीलदार यांनी केल्यानंतर त्यानुसार विस्थापित नागरिकांना जेवढे ब्लँकेट लागतील तेवढे ब्लँकेट देण्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी जाहीर केले.
काल रात्री तहसील कार्यालयाच्या मागणीनुसार संजयमामा यांच्या सूचनेनुसार महामुनी मंगल कार्यालय येथील विस्थापितांना 85 ब्लॅंकेट चे वाटप संजयमामा शिंदे गटाचे शिवराज जगताप, अजिंक्य पाटील व सुजित तात्या बागल यांच्या हस्ते करण्यात आले. आज आनंदी मंगल कार्यालय व आवाटी दर्गा येथील विस्थापितांसाठी आवश्यक असलेल्या ब्लँकेट मा .आ. शिंदे यांचे कडून तहसील कार्यालयात जमा केल्या .तहसील कार्यालयाकडून बाधितांना त्याचे वाटप केले जाईल.
टिप्पण्या