मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय,मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य – मुख्यमंत्री फडणवीस ठरले मराठ्यांचे उद्धारकर्ते

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
मुंबई :मराठा समाजाचा पाच दशकांहून अधिक काळ सुरू असलेला आरक्षणाचा लढा अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.मराठवाडा गोदा पट्यातील जिद्दी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनातील मराठा समाजाच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केल्याने मराठा समाजाचा हा ऐतिहासिक विजय मानला जात आहे.
🔥मराठा आरक्षण इतिहासाची परंपरा – अण्णासाहेबांपासून जरांगे पाटीलपर्यंत
मराठा आरक्षणाची चळवळ ही नवीन नाही. वारणा खोऱ्यातील शेतकरी नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांनी 1970 च्या दशकात या लढ्याची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर स्व.अण्णासाहेब जावळे,स्व.विनायक मेटे,पुरुषोत्तम खेडेकर,प्रवीण गायकवाड,विनोद पाटील यासह विविध अभ्यासक,मराठा नेत्यांनी प्रयत्न केले,आरक्षण मागणीसाठी लखोचे मोर्चे निघाले, शेकडो तरुणाचे बलिदान झाले.परंतु प्रश्न मार्गी लागला नाही.यावेळी मात्र “मागणारा लायकीचा होता आणि देणारा कुवतीचा होता, नाहीतर काँग्रेस-आघाडीने गेली ५० वर्षे मराठा समाजाला झुलवत ठेवलं” अशी तीव्र भावना समाजात व्यक्त होत आहे.
🔥जरांगे पाटीलांची भूमिका – अहिंसक आंदोलनातून विजय
मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही वर्षांत शांततामय, अहिंसक आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. जालना जिल्ह्यातून सुरू झालेले हे आंदोलन राज्यभर व देशभर गाजले. त्यांनी एकट्याने सुरू केलेल्या लढ्याला समाजाने प्रचंड पाठिंबा दिला आणि हा लढा अखेरीस सरकारसमोर निर्णायक ठरला.
💥सरकारचा निर्णायक निर्णय – फडणवीस यांचे नेतृत्व ठळक
मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसमावेशक निर्णय घेण्याची तयारी दाखवली. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील व समिती सदस्य यांचा मोठा पाठिंबा मिळाला.या सामूहिक प्रयत्नांतूनच समाजाचा प्रश्न सोडवता आला.
💥मराठ्यांसाठी लागू केलेल्या योजना – फडणवीस कार्यकाळातील ठळक उपक्रम
🔹शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना – उच्च व परदेशी शिक्षणासाठी विशेष सहाय्य
🔹कर्जमाफी व व्याजमुक्त कर्ज योजना – शेतकऱ्यांना दिलासा
🔹शासकीय नोकरी व व्यावसायिक अभ्यासक्रमात आरक्षण
🔹वसतिगृह सुविधा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे
🔹क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात प्रोत्साहन योजना
🔹शेतकरी उत्पादन बाजार समित्यांत प्रतिनिधित्व
या योजनांमुळे नव्या पिढीला रोजगार, शिक्षण आणि स्वावलंबनाकडे वाटचाल करता आली.
💥समाजातील भावना – विजय उत्सवाचे वातावरण
शासनाने मागण्या मान्य केल्याच्या घोषणेनंतर मराठा बहुल भागात विजय उत्सवाचे वातावरण दिसून आले. गावागावांत फटाके फोडले गेले, साखरपेरणी झाली, तर आंदोलनात सहभागी झालेल्यांचा सत्कारही करण्यात आले.
“हा केवळ आरक्षणाचा विजय नाही, तर मराठा समाजाच्या सन्मानाचा विजय आहे” अशी भावना व्यक्त होत.कायदेशीर पाया मजबूत ठेवून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, या अपेक्षेने समाज आता पुढे पाहत आहे. शासनाने घेतलेले निर्णय दीर्घकाळ टिकतील आणि न्यायालयीन कसोटीला उतरतील याची खात्री लोकांना हवी आहे.
स्व.अण्णासाहेब पाटील यांनी पेटवलेली ठिणगी आणि मनोज जरांगे पाटील यांनी केलेली अखंड लढाई अखेरीस फळास आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सामूहिक प्रयत्नांतून मराठा समाजाचा प्रश्न सोडवला गेला.
हा विजय मराठा समाजाच्या संघटित शक्तीचा आणि चिकाटीचा पुरावा ठरला.

💥मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी सध्या सुरु असलेल्या योजना








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल