(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥) करमाळा तालुक्यातील शेतकरी अजूनही दुष्काळ निधीपासून वंचित: निधीबाबत गणेश चिवटे यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन;त्वरीत मदतीची मागणी

करमाळा(स्था.प्र.):तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सन 2023-24 चा दुष्काळ अनुदान निधी अद्यापही प्राप्त न झाल्याने नाराजीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांची मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व त्यांना यासंदर्भात एक सविस्तर निवेदन सादर केले.या निवेदनात गणेश चिवटे यांनी स्पष्ट केले की, करमाळा तालुक्यातील कोर्टी मंडळ तसेच इतर अनेक गावांतील शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करूनदेखील अद्याप दुष्काळ सहाय्य निधी प्राप्त केलेला नाही. शासनाने जाहीर केलेल्या निकषांनुसार सदर शेतकरी दुष्काळग्रस्त असूनही त्यांना कोणताही आर्थिक लाभ मिळालेला नाही.या शेतकऱ्यांना त्वरित दुष्काळ निधी वितरित व्हावा, जेणेकरून आगामी पेरणीसाठी आवश्यक ती आर्थिक तयारी शेतकरी करू शकतील असे सांगितले,
तसेच निवेदनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीरतेने घेऊन निधी वितरण प्रक्रियेचे तातडीने पुनरावलोकन करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली.पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील या निवेदनाची सकारात्मक दखल घेतली असून संबंधित विभागाशी चर्चा करून लवकरच आवश्यक त्या कारवाईस सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल