माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी मंजूर केलेल्या 4 कोटी 20 लाख निधीची तलाठी व सर्कल कार्यालय बांधकामे प्रगतीपथावर
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा:-(स्था.प्र.) माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी डिसेंबर 2023 च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय असलेल्या महसूल विभागातील मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय बांधकामासाठी 4 कोटी 20 लाख निधी मंजूर केला होता.प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत कार्यालय असते परंतु तलाठी कार्यालय तालुक्यांमध्ये जवळपास नाहीत.जी आहेत ती मोडकळीला आलेली आहेत किंवा ग्रामपंचायतीच्या आश्रयाने उभी आहेत ही अडचण लक्षात घेऊन तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी तलाठी व सर्कल कार्यालय बांधकामासाठी प्रत्येकी 15 लाख रुपये याप्रमाणे 28 बांधकामासाठी 4 कोटी 20 लाख निधी मंजूर केला होता. ही बांधकामे आता प्रगतीपथावर असून माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आज करमाळा शहरातील जुन्या सर्कल कार्यालयाला भेट दिली.यावेळी मां.राजेंद्र पांडेकरे साहेब मंडळ अधिकारी करमाळा,मां.निलेश मुरकुटे भाऊसाहेब तलाठी जातेगाव व मां.विनोद जवणे भाऊसाहेब तलाठी करमाळा यांनी स्वागत केले याप्रसंगी करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भरत अवताडे, अश्फाक जमादार, सुजित बागल ,विवेक येवले आदी उपस्थित होते. करमाळा येथील नवीन सर्कल कार्यालयाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.
या गावात सुरू आहेत मंडळ अधिकारी कार्यालये बांधकाम 👇
करमाळा, जेऊर, केम ,सालसे, अर्जुननगर ,कोर्टी, केतुर व उमरड
या गावात सुरू आहेत तलाठी कार्यालये बांधकाम👇
देवळाली, जातेगाव, वांगी, निंभोरे, गुळसडी ,कंदर ,घोटी, पांगरे, आवाटी साडे कोळगाव करंजे रावगाव वीट जिंती हिंगणी कात्रज , चिखलठाण ,वाशिंबे व शेटफळ
टिप्पण्या