शेलगाव (क) येथे आरोग्य शिबिरास 260 लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
प्रतिनिधी – शेलगाव (क), ता. करमाळा येथे ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले.
या यात्रेदरम्यान 11 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर, 12 ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य शिबिर, कुस्ती आखाडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.मोफत आरोग्य शिबिराचा लाभ 260 लाभार्थ्यांनी घेतला. यामध्ये 40 वर्षांवरील 178 रुग्णांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
ज्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता होती, त्यांना ऑपरेशनसाठी निश्चित तारीख देण्यात आली.
या रक्तदान शिबिरात 71 रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान केले.हे शिबिर मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे चॅरिटेबल हॉस्पिटल, करमाळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यात एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, महंमदवाडी (हडपसर, पुणे), सुविधा हॉस्पिटल, बार्शी, सुश्रुत हॉस्पिटल, बार्शी, उपजिल्हा रुग्णालय, करमाळा तसेच मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे चॅरिटेबल हॉस्पिटल, करमाळा येथील डॉ. ओंकार उघडे यांचा सहभाग होता.शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रदीप बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पण्या