भाजपा प्रदेश कार्यालयात गणेश चिवटेंच्या नावाचा बोलबाला....
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
मुंबई – भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात काल करमाळा तालुक्यातील जनसामान्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. करमाळा तालुक्यात भाजपाचे नेतृत्व करत असलेले भाजपाचे प्रभावी नेते गणेश चिवटे यांच्या कार्याचा आणि नेतृत्वगुणांचा बोलबाला थेट मुंबईतील भाजपा कार्यालयात उमटताना दिसून आला.या प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी चिवटे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व पक्षबांधणीच्या कार्याची स्तुती करत त्यांचे विशेष कौतुक केले. करमाळा तालुक्यात भाजपाचा झेंडा बळकट करणाऱ्या चिवटे यांच्या कार्यशैलीमुळे तालुक्याच्या राजकीय समीकरणात नवे वळण दिसत आहे.या कार्यक्रमात करमाळा नागरिक संघटनेचे नेते कन्हैयालाल देवी, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सौ. माया झोळ व मा.सूर्यकांत पाटील यांनी भाजपामध्ये अधिकृत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यास,वर उल्लेखित नेत्यांसह भाजपा राज्य महिला आघाडीच्या उपाध्यक्षा रश्मी बागल कोलते,भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार,पै. रामभाऊ ढाणे,भाजपा करमाळा मंडल अध्यक्ष काकासाहेब सरडे, सरचिटणीस नितीनभाऊ झिंजाडे,आदिनाथ सुरवसे, शहराध्यक्ष जगदीश अगरवाल,जेष्ठ नेते भगवानगिरी गोसावी,जयंत काळे पाटिल यांच्यासह करमाळा तालुक्यातील प्रमुख भाजपा पदाधिकारी आणि हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान प्रदेश कार्यालयात उत्साही वातावरण निर्माण झाले होते. नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे स्वागत करताना चिवटे यांनी सांगितले की, “आज भाजपात प्रवेश घेतलेल्या सर्वाना सोबत घेत करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास आणि भाजपाच्या विचारधारेची पाळंमुळं गावपातळीपर्यंत रुजविणे हेच आपले ध्येय आहे.”
टिप्पण्या