मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथे गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे,या उपक्रमाचा एक भाग म्हणून भाजपा करमाळा शहर मंडलाच्या वतीने दि. २२ जुलै रोजी भाजपा संपर्क कार्यालय गायकवाड चौक करमाळा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या रक्तदान शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली,पुढे बोलताना त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हा कार्यकर्त्यांना एक विशेष आवाहन केले आहे की "माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोस्टर, फलक, जाहिराती यांवर खर्च करण्याऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, याच माझ्यासाठी खऱ्या अर्थाने शुभेच्छा होतील."
या सुचनेनुसार आम्ही करमाळा येथे देवाभाऊंच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त कमीतकमी 555 व जास्तीत जास्त 1000 पेक्षा जास्त बल्ड बॅग संकलन करून हा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम घेणार आहे. यावेळी भाजपा करमाळा मंडल अध्यक्ष काकासाहेब सरडे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीरच्या दृष्टीने आवश्यक नियोजन झाले असून जिल्ह्यात सर्वाधिक रक्त पिशव्या संकलन करण्याचा आमचा संकल्प आहे.
टिप्पण्या