शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय....२०१३-१४च्या शेतीमालालाच्या हमीभावात दुपटीपेक्षा हमीभाव जाहीर....

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
नवी दिल्ली -शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला असून २०१३-१४च्या शेतीमालालाच्या हमीभावात २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल दुपटीपेक्षा हमीभाव जाहीर केला आहे.अलीकडेच सरकारने उसाचा हमीभाव ३५५० रु केला आहे.आताच जाहीर केलेल्या हमीभाव यादीनुसार धानाचा हमीभाव १३१० रु. वरून २३८९ रु.झाला आहे. ज्वारीचा हमीभाव १५०० रुपयावरून ३७४९ रु झाला आहे. बाजरीचा हमीभाव १२५० रु.वरून २७७५ रु झाला आहे. मक्याचा हमीभाव १३१०रु. वरून २७७५ रु झाला आहे. तुरीचा हमीभाव ४३०० रु.वरून ८००० रु झाला आहे. मूग ४५००रु. वरून ८७६८ रु झाला आहे. उडीद ४३०० रु.वरून ७८०० रु झाला आहे. भुईमूग शेंग ४०००रु. वरून ७२६३ रु झाला आहे. सूर्यफूल ३७०० रु.वरून ७७२१ रु झाले आहे. तीळ ४५००रु. वरून ९८४६ रु झाला आहे. कापूस ३७००रु. वरून ८११० रु हमीभाव झाला आहे.या वाढलेल्या हमीभावामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाढलेला हमीभाव खालीलप्रमाणे 👇

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल