घरकुल सर्वेक्षणासाठी १५ दिवसाची मुदत वाढ मिळावी......माजी आमदार संजयमामा शिंदे यांची पालकमंत्र्याकडे मागणी.

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
मुंबई स्था.प्र. :-प्रधानमंत्री आवास योजना(ग्रामीण) योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेघर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांचा आवास प्लस २०२५ सर्व्हेक्षण सध्या करमाळा तालुक्यात सुरू आसून शासनाने या सर्व्हसाठीची अंतिम मुदत वाढवून ती ३१ मे २०२५ पर्यंत केली होती. शासनाने मुदत वाढवून दिली खरी परंतु करमाळा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्हा व महाराष्ट्र राज्यातच १५ मे पासून अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे अनेक ठिकाणी संबंधित गावातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी घरकुल सर्वेक्षण साठी गावातील वाडी, वस्ती वरती पोहोचू शकलेले नाही. त्यामुळे अद्यापही अनेक कुटुंबे सर्वेक्षणापासून वंचित आहे ही समस्या आपण ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्याकडे काल मुंबई येथे विधिमंडळात भेट घेऊन मांडली आहे व किमान १५ दिवसाची मुदत वाढ या सर्वेसाठी मिळावे अशी मागणी केली असल्याची माहिती माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली. 
          ज्या कुटुंबांना आजपर्यंत घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा गरजू व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपले सर्व्हेक्षण तात्काळ करून घ्यावे असे आवाहन माजी आमदार शिंदे यांनी केले आहे. घरकुल प्राप्त असणाऱ्या लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने अल्प दरात किंवा मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल