करमाळा मतदार संघात संजयमामांचीच हवा गावागावात फक्त मामांचीच चर्चा ...
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा -माजी आमदार असताना सुद्धा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री संजय मामांच्या निवासस्थानी भेट देतात .त्यांचा आदरसत्कार स्वीकारतात यावरून संजयमामा शिंदे हे एक वेगळं रसायन आहे याची प्रचिती करमाळा तालुक्याला यायला लागली असून मतदारसंघातील गावागावात, गल्लीगल्लीत, घराघरात फक्त संजय मामांचीच हवा असल्याचे चित्र सध्या तालुक्यात स्पष्टपणे दिसत आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संजय मामा शिंदे हे नाव अडगळीत पडेल या पद्धतीने विरोधकांनी रणनीती आखली आणि आदिनाथ कारखाना निवडणुकीतही संजयमामांना पराभव चाखायला भाग पाडले. या साऱ्या घडामोडीनंतर महाराष्ट्र सरकारमधील उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार व ना.माणिकराव कोकाटे दोन वजनदार मंत्री मामांचे घरी भेट देतात हे विशेष आहे अशी चर्चा सध्या तरुणाई करत आहे.
आदिनाथ कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने बारामती कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे आणि संजय मामा शिंदे यांनी अजित दादा पवार यांची भेट घेतल्यानंतर विरोधकांकडून यावरती टीकास्त्र करताना त्यांना दोन मिनिट सुद्धा वेळ दिला नसेल, त्यांना हाकलून लावला असेल अशा पद्धतीची टीका टिप्पणी जाहीर सभांमधून केली गेली होती. त्यानंतर अवघ्या आठच दिवसांमध्ये संजय मामांचे निवासस्थानी नामदार अजितदादा पवार यांनी भेट दिली होती. त्यावेळेस त्याचीही चर्चा सर्वत्र झाली होती. परवा
कृषी मंत्री ॲङ माणिकराव कोकाटे यांचा सोलापूर जिल्हा दौरा होता. परंतु पावसामुळे सदर दौरा रद्द होऊन सुद्धा आमदार माणिकराव कोकाटे यांनी संजय मामा शिंदे यांचा पाहुणचार स्वीकारला. विद्यमान आमदार यांना टाळून माजी आमदार यांच्या निवासस्थानी मंत्र्यांनी भेट देणे हे विशेषच आहे.
यावेळी संजयमामांनी शेलगांव(वांगी) ता.करमाळा येथे केळी संशोधन केंद्र होणेबाबत प्रामुख्याने मागणी करुन प्रलंबित ड्रिपचे अनुदान त्वरित मिळावे,कांदाचाळी ज्यांच्या बांधून पूर्ण आहेत त्यांचे अनुदान,महा डिबीटी बंद आहे ते त्वरित चालू करावे, त्याचबरोबर शेतकरी यंत्र सामग्री अनुदान वाढवून मिळावे या प्रमुख मागण्या केल्या.
टिप्पण्या