शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय.... शेतरस्त्याची नोंद लागणार आता ७-१२ उताऱ्यावर
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
मुंबई :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला असून,शेतात जाणाऱ्या शेतरस्त्याची नोंद आता ७-१२ थेट उताऱ्यावर इतर हक्कात लागणार आहे.यामुळे शेतातील रस्त्यासंबधात होणारे वाद आता कायमस्वरूपी संपणार आहेत.याबाबत २२ मे २०२५ रोजीच्या निर्णयानुसार राज्य सरकारने शेतरस्ता उपलब्ध करून देणे व ७-१२ उताऱ्याच्या इतर हक्क सदरी नोंद घेणेबाबत क्षेत्रीय अधिकारी, प्राधिकारी यांना दिशानिर्देश दिले आहेत.या शासन निर्णयानुसार
💥रस्त्याची रुंदी ३ ते ४ मीटर असणे
💥रस्ता कलम १४३ व कलम ५ नुसार दिलेल्या रस्त्याची नोंद ७-१२ उताऱ्यावर कायमस्वरूपी लागणार
💥रस्त्याबाबत ९० दिवसात निकाल देणे बंधनकारक
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक २०२५०५२२१७१००५९०१९ असा आहे.
शासन निर्णय क्रमांकः जमीन-२०२५/प्र.क्र.४७/ज-१अ
टिप्पण्या