दहिगाव योजना बंद नलिकेचे काम चुकीचे.मग वर्षभर विरोध का नाही केला ? मा.आमदार संजयमामा शिंदे यांचा आमदार नारायण पाटील यांना थेट सवाल
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा :- दहिगाव योजना बंद नलिकेचे काम चुकीचे होते तर मग वर्षभर विरोध का नाही केला ? असा सवाल माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी विद्यमान आमदार नारायण पाटील यांना केला आहे.
दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिकेचे काम माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या उपस्थितीत डिसेंबर 2023 मध्ये सरकारी नियमानुसार सुरू झाले होते. हे काम डिसेंबर 2024 पर्यंत वर्षभर सुरू होते त्यावेळेस नारायण पाटील यांनी या कामाला विरोध का नाही केला ?
तहसील कार्यालयाच्या हस्तांतरणाला विरोध म्हणून त्यांनी आंदोलन केले मग बंद नलिका वितरण प्रणालीचे सुरू असलेले काम चुकीचे होते तर मग त्या विरोधात आंदोलन का केले नाही ? असे प्रश्न उपस्थित करताना ही उपरती त्यांना आमदार झाल्यानंतरच का झाली या पाठीमागचे नेमके कारण त्यांनी जनतेला सांगावे असे नारायण पाटील यांना संजयमामा शिंदे यांनी थेट आवाहन केले आहे.
याबाबत पुढे बोलताना मा.आमदार शिंदे म्हणाले, 'मी फक्त विकासाचे राजकारण केले आहे. कोणतेही, कोणाचेही काम हाणून पाडले नाही. राजकारणासाठी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. पाईप जाळणारे नेमके कोणाचे कार्यकर्ते आहेत? पोलिसांनी याचा योग्य तपास करावा.
तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची योजना आहे. सरकारी धोरणानुसार या योजनेच्या बंद नलिकेचे काम सुरु आहे. माझ्या कार्यकाळात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आवर्तने देण्याचा मी प्रयत्न केला. सरकारी धोरणानुसार बंद नलिकेच्या कामासाठी आपण निधी उपलब्ध करून दिला आहे.या कामामुळे लाभक्षेत्रातील गावे वाढण्यास मदत होणार आहे. तसा प्रस्ताव सरकारकडे आहे. पाण्याची चोरी व पाणी बचत होऊन शेतीलाच त्याचा फायदा होणार आहे.
विद्यमान आमदारांना जर ते काम चुकीचे वाटत असेल तर तसं लेखी पत्र त्यांनी शासनाला द्यावं. याबद्दल तारांकित प्रश्न उपस्थित करावा. सुरू असलेल्या कामाच्या विरोधात त्यांनी आंदोलन करावं. हे न करता ते काम बंद पाडणे, पाईप जाळणे याचे समर्थन करत असतील तर ही खेदजनक बाब आहे.
टिप्पण्या