कोळगाव सब स्टेशनचा वीज पुरवठा प्रश्न लवकरच मार्गी लागणार - गणेश चिवटे

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा - करमाळा तालुक्यातील कोळगाव येथील सबस्टेशनचा वीज पुरवठा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असलेची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की,करमाळा तालुक्यातील कोळगाव सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाच ते सहा गावात गेल्या अनेक दिवसांपासून आठ तासाऐवजी फक्त सहा तास कमी दाबाने विद्युत पुरवठा केला जात होता यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते.कोळगाव सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या सहा ते सात गावातील शेतकऱ्यांनी भाजपा नेते गणेश चिवटे यांची भेट घेतली व सदर विज पुरवठा बाबतचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती केली.यावर गणेश चिवटे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली व करमाळा तालुक्यातील हा विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती केली.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्याचे ए.एस.ई माने साहेब यांच्याशी संपर्क करून हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती गणेश चिवटे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल