वाशिंबे ग्रामपंचायतमध्ये रामनवमी उत्सव उत्साहात साजरा.....(ग्रामपंचायतमध्ये रामनवमी साजरी करणारे वाशिंबे गाव ठरले महाराष्ट्रात पहिले)

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा :- वाशिंबे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणजे रामनवमी उत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.ग्रामपंचायत कार्यालयात रामनवमी साजरी करणारे वाशिंबे हे गाव महाराष्ट्रात पहिले ठरले असून यामुळे या कार्यक्रमाची राज्यभर मोठी चर्चा व कौतुक होत आहे.
      प्रभू श्रीराम हे अखंड भारतभूमीचे आराध्य दैवत आहे.सत्य व एकवचनीपणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून हिंदू समाज प्रभू श्रीरामांना आदर्श मानतो.धार्मिक क्षेत्रात काम करणारे भाविक सर्रासपणे रामनवमी साजरी करत असतात पण वाशिंबे ग्रामपंचायतने कार्यालयात रामनवमी उत्सव साजरा करून राज्यातील सगळ्या ग्रामपंचायतींना एक नवा आदर्श घालून दिला आहे.
यावेळी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.या श्रीरामनवमी उत्सव कार्यक्रमास वाशिंबे गावाचे सरपंच तानाजी बापू झोळ,उपसरपंच धोंडीराम कळसाईत,माजी सरपंच प्रताप झोळ,मा.उपसरपंच अमोल पवार,राहुल शिंदे,शरद शिंदे,अतुल पाटील,भरत शिंदे,सागर राऊत,अमोल भोंग,दत्तात्रेय डोंबाळे,अतुल पवार,सौरभ झोळ,मंगेश झोळ,रितेश पवार,प्रताप पाटील,संदेश झोळ,ग्रामपंचायत कर्मचारी अशोक ननवरे ,देविदास राऊत आदी ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल