करमाळा भाजपा तालुका अध्यक्षपदी काकासाहेब सरडे यांची निवड
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा - भाजपा करमाळा मंडलसाठी करंजे गावचे माजी सरपंच काकासाहेब सरडे यांची निवड करण्यात आली आहे, शेलगाव वां येथील शिवम प्राइड हाॅटेल येथे भारतीय जनता पार्टीच्या बैठकीत त्यांना निवडणूक प्रमुख संदेश काकडे यांनी निवडीचे पत्र देऊन तालुका अध्यक्षपद घोषित केले,तसेच करमाळा ग्रामीण मंडळासाठी सचिन पिसाळ यांची निवड करण्यात आली आहे, या निवडीवेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे उपस्थित होते, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडी काल प्रदेश पातळीवरून जाहीर करण्यात आल्या व प्रत्येक तालुक्यामध्ये निवडणूक प्रमुखांनी नवनिर्वाचित तालुका अध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अफसर तात्या जाधव, तालुका अध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, भगवान गिरी गोसावी, निवडणूक निर्णय अधिकारी संदेश काकडे, यलपले साहेब, नितीन झिंजाडे, बंडू शिंदे, मोहन शिंदे, डॉ अभिजीत मुरूमकर, सोमनाथ घाडगे, अशोक ढेरे, लक्ष्मण शेंडगे, लक्ष्मण केकान, शुभम बनगर ,अमोल जरांडे, दत्तात्रय पोटे, सागर सरडे, हर्षद गाडे, रंजित पवार, नागनाथ केकान, प्रमोद सोनवने, दिगंबर राखुंडे , कपिल मंडलिक, रविकिरण माळवे, चंद्रशेखर सरडे, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
टिप्पण्या