लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर यांना मातृशोक,रमजानच्या पवित्र महिन्यात निधन झाल्याने विशेष महत्त्व
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा प्रतिनिधी :-दैनिक लोकमतचे पत्रकार,कमलादेवी औद्योगिक वसाहतीचे सचिव तथा करमाळा डिजिटल मीडिया मार्गदर्शक नासीरभाई कबीर व महसुल मंडल अधिकारी हुस्नोदिन कबीर यांच्या मातोश्री रशिदाबी शमसुद्दीन कबीर यांचे राहत्या घरी वृध्दापकाळाने दुखःद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले दोन मुली सुना नातवंडे पणतू असा मोठा परिवार आहे.रशिदाबी शमसुद्दीन कबीर या सैराट फेम सल्या उर्फ अरबाज शेख यांच्या त्या आजी होत्या.रशिदाबी कबीर यांचे रमजानच्या पवित्र महिन्यात निधन झाल्याने त्याला विशेष महत्त्व असुन रमजान महिन्यात निधन झाल्यानंतर त्यांना स्वर्गात स्थान मिळते अशी धारणा असल्यामुळे हे मरण पवित्र मानले जाते.
टिप्पण्या