२०२१ पासून ची प्रलंबित आरोग्य उपकेंद्राची कामे मार्गी लागणार, ३कोटी रुपये निधी उपलब्ध:मा.आ.संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नांचे फलित
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स)
करमाळा,(प्रतिनिधी):-आरोग्य सेवा व अभियान संचालक आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या ०४/०३/२०२५ च्या मंजूर टिपणीने २०२१ पासून ची निधी अभावी प्रलंबित असलेली ग्रामीण रुग्णालय व आरोग्य उपकेंद्रासाठी निधी मंजूर झाला असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ८ ग्रामीण रुग्णालयांसाठी प्रत्येकी ५० लाख व २० आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी प्रत्येकी ६१ लाख १९ हजार याप्रमाणे निधी मंजूर झाला असून यामध्ये करमाळा तालुक्यातील १ ग्रामीण रुग्णालय तर ४ आरोग्य उपकेंद्र बांधकामाचा समावेश आहे.
१५व्या वित्त आयोगांतर्गत सन २०२४-२५ व २०२५-२६ चा प्रकल्प अंमलबजावणी आराखडा मंजूर झालेला आहे. या आराखड्यानुसार ग्रामीण रुग्णालय करमाळा ता. करमाळा येथे BPHU बांधकाम करणे - ५० लक्ष,प्रा.आ.उपकेंद्र करंजे ता. करमाळा बांधकाम करणे ६१.१९ लक्ष,प्रा. आ. उपकेंद्र निंभोरे ता. करमाळा बांधकाम करणे ६१.१९ लक्ष,प्रा.आ. उपकेंद्र फिसरे ता. करमाळा बांधकाम करणे -६१.१९ लक्ष,प्रा.आ. उपकेंद्र मांगी ता. करमाळा बांधकाम करणे - ६१.१९ लक्ष असा २ कोटी ९४ लक्ष ७६ हजार निधी मंजूर झाला आहे. २०२१ पासूनच्या माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था मजबूत होणार आहे.