करमाळा हीच कर्मभूमी,सभासदांनी विश्वास टाकल्यास आदिनाथ सक्षमपणे चालवू-मा.आ.संजय मामा शिंदे

(🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- सभासदांनी विश्वास टाकल्यास आदिनाथ सहकारी साखर कारखाना आपण सक्षमपणे चालवू असे प्रतिपादन करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे.काल दि.१० रोजी दुपारी करमाळा येथील विठ्ठल निवास या ठिकाणी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले कि,सध्या साखर कारखानदारी पुढे अनेक आव्हाने असून त्याचा सामना कारखान्यांना करावा लागत आहे.साखर कारखानदारी चालवण्याचा आपला अनुभव जुना असून या क्षेत्रातील आव्हानावर मात आपण निश्चित करु.मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडून निधीची हमी घेऊन आपण आदिनाथ कारखान्यास पुन्हा गतवैभव मिळवून देऊ व आदिनाथ सहकारी साखर कारखाना सक्षमपणे चालवु असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
 🛑करमाळा हीच कर्मभूमी-
 आपली जन्मभूमी निमगाव टे असली तरी यापुढील काळात कर्मभूमी ही करमाळा तालुकाच राहील.भविष्यात मतदारसंघ फेरारचनेत माढा तालुक्यातील छत्तीस गावी तुटली तरी करमाळा हीच कर्मभूमी म्हणून काम करू,त्यामुळे विरोधकांनी माझ्या राजकीय भवितव्याची चिंता करू नये असेही ते म्हणाले. दरम्यान विधानसभा निवडणुकीत करमाळा तालुक्यातील जनतेने मला दुसऱ्या क्रमांकाचे मतदान करून आपल्यावर विश्वास दाखवला याबद्दल त्यांनी करमाळ्यातील जनतेचे ही आभार मानले. येथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी मा.आ.शिंदे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास टाकत त्यांच्या धोरणानुसार कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भातील आगामी वाटचाल असेल असे सांगितले.यावेळी सुहास गलांडे सर, वामनदादा बदे, तात्यासाहेब मस्कर, विवेकराव येवले, पोपटराव सरडे, चंद्रकांत सरडे, राजेंद्र बारकुंड, सुजित तात्या बागल, आणि ऍड.अजित विघ्ने यांची भाषणे झाली.या विचारविनिमय बैठकीसाठी करमाळा तालुक्यातील संजय मामा समर्थक मोठ्या संख्येने हजर होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल