करमाळा उपजिल्हा रुग्णालय सर्व सोईसुविधासह लवकरच लोकांच्या सेवेत येणार :मा.आमदार संजयमामा शिंदे अधिकारी,कर्मचारी यांच्या वसाहतीचेही काम अंतिम टप्प्यात
(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा,प्रतिनिधी :- करमाळा उपजिल्हा रुग्णालय सर्व सोईसुविधासह लवकरच लोकांच्या सेवेत येणार असलेची माहिती माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.
माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी उपविभागीय रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली आहे.माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी २०१९ ते २४ या कार्यकाळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून करमाळा विधानसभा मतदार संघाच्या विकास कामांसाठी अनेक महत्त्वाच्या योजनांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणलेला होता.त्या पैकी करमाळा उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत बांधकाम करणे व अधिकारी कर्मचारी वसाहत बांधकाम करणे या २ कामांसाठी तब्बल ४३ कोटी निधी त्यांनी मंजूर करून आणला होता.ही दोन्हीही कामे आता पूर्णत्वाकडे आलेली आहेत. लवकरच त्याचे लोकार्पण होणार असून या कामाची पाहणी आज दि.२८ रोजी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा, उपजिल्हा रुग्णालय येथील अधिकारी कर्मचारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.करमाळा तालुक्याच्या दृष्टीने आरोग्य क्षेत्रातील हे अतिशय महत्त्वाचे काम आहे.
🛑अशी असेल उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत -
सदर इमारत ही तळमजला आणि इतर दोन मजले असली आहेत.
🌑एकूण 7320.21 चौमी बांधकामाचे क्षेत्रफळ आहे.यामध्ये बेसमेन्ट मजल्यावरती वाहनतळ ,ऑक्सीजन सिलेडर स्टोअर असणार आहे.
🌑तळ मजल्यावर तपासणी केंद्र, एलडीआर-1 आणि एलडीआर-2, विलगीकरण कक्ष, (Isolation ward), एचडीयू, चाइल्ड ओपीडी, एएनसी वॉर्ड, ऑपरेशन थिएटर टॉयलेट प्रस्तावीत आहेत.
🌑पहिल्या मजल्यावर पीएनसी वॉर्ड, पेडियात्रिक वॉर्ड, आयसीयू, फिमेल सर्जिकल वॉर्ड, फिमेल मेडिकल वॉर्ड, डायालिसीस सेंटर असणार आहे तर दुसऱ्या मजल्यावर मेल सर्जिकल वॉर्ड, मेल मेडिकल वॉर्ड, वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कॉन्फरन्स रूम, संगणक रुम असणार आहेत.
🌑भूमिगत पाण्याची टाकी, सेप्टीक Tank, रेनवाटर हार्वेस्टिंग, भूविकास (पार्कस आणि गार्डन)अंतर्गत रस्ते संरक्षक भिंत व गेट व विद्युत विषयी कामांचा समावेश आहे.
🌑आतापर्यंत या कामावर १७३३.६७ लक्ष खर्च झालेला आहे. उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत बांधकाम पूर्ण झाले असून दरवाजे, खिडक्या व रंगकाम सध्या बाकी आहे .हे काम पूर्ण झाले की इमारत रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे अशी माहिती मा.आ. संजयमामा शिंदे यांनी शेवटी दिली आहे.
टिप्पण्या