भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयीयांच्या जयंतीनिमित्त गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रमांचे आयोजन
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- दिवंगत भाजपा नेते,भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने करमाळा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन भाजपा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात होणार आहे.
यामध्ये बुधवार दिनांक 25/12/2024 रोजी देवळाली ता करमाळा येथील ग्रामपंचायत शेजारी टाऊन हॉल येथे सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नेत्ररोग तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी भाजपा युवा मोर्चा करमाळा व एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांचे विशेष सहकार्य आहे.गुरुवार दिनांक 26/12/2024 रोजी करमाळा येथील भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय गायकवाड चौक येथे सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत कवी स्नेहसंमेलन आयोजित केले आहे.शुक्रवार दिनांक 27/12/2024 रोजी भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय गायकवाड चौककरमाळा येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, कवी संमेलन व रक्तदान शिबीराचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे व करमाळा भाजपाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी केले आहे.
टिप्पण्या