करमाळ्यात 16 फेब्रुवारी रोजी श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन;जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे गणेश(भाऊ) चिवटे यांचे आवाहन

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा - श्रीराम प्रतिष्ठान,करमाळा आयोजित सालाबाद प्रमाणे चालू वर्षी ही भव्य-दिव्य स्वरूपात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन 16 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे,अशी माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.पुढे बोलताना ते म्हणाले की,गेली दोन वर्षापासून आम्ही करमाळा तालुक्यातील व परिसरातील सर्व जाती-धर्मातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुला मुलींची लग्न श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत लावून देत आहोत.सन 2023 मध्ये 21 व सन 2024 मध्ये 31 विवाह सोहळे आम्ही यशस्वी पार पाडले आहेत.या वर्षी आमचे हे तिसरे वर्ष असून आम्ही जास्तीत जास्त विवाह श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून लावणार आहोत.या विवाहामध्ये वधू-वरांना आवश्यक त्या माना पानाच्या सर्व सुविधा देणार आहोत.तसेच या विवाह सोहळ्यात वधू वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी सामाजिक,राजकीय व धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या विवाह सोहळ्यात तालुक्यातील व परिसरातील वधू- वरांनी जि.एन .सि मिल्क सेंटरच्या करमाळा, कोर्टी, वरकुटे, घारगाव येथील केंद्रावर तसेच गायकवाड चौक करमाळा येथील भाजपा संपर्क कार्यालय व श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था दत्तपेठ करमाळा येथे नोंदणी करावी. या सामुदायिक विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आव्हान गणेश चिवटे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल