सर्व समजघटकांच्या सेवेसाठी विधानसभेत काम करण्याची पुन्हा संधी द्या : संजयमामा शिंदे
करमाळा :- सर्व समजघटकांच्या सेवेसाठी विधानसभेत पुन्हा काम करण्याची संधी द्या असे प्रतिपादन करमाळा विधानसभेचे अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांनी करमाळा वासियांना उद्देशून केले आहे.करमाळा येथील सुभाष चौकात त्यांच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी मोहंमदभाई शेख हे होते.पुढे बोलताना संजयमामा शिंदे म्हणाले की,करमाळा विधानसभेचे काम करत असताना व त्याआधीही आपण सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना मला येथील प्रश्न सोडवण्याची संधी मिळाली.विकासकामे करत असताना आपण कधीही राजकारण केले नाही, कोणत्या गावात किती मत मिळाली हे पाहुन विकासकामे अडकून ठेवली नाहीत,कोण कोणत्या गटाचा आहे हे पाहुन काम केले नाही.समाजातील सर्व धर्मीय व सर्व जातीय समाज घटकांना सोबत घेत आपण सर्वांच्या विकासाचा दृष्टिकोन समोर ठेऊन काम केले आहे.तालुक्यात प्रलंबीत असणारे रस्ते,पाणी,आरोग्य या बाबतीत भरीव काम केले आहे.शेतकऱ्यांना दुष्काळी मदत असो किंवा वीजेचे प्रश्न असो हे प्रश्न आपण फक्त दोन अडीच वर्षात चांगल्या प्रकारे मार्गी लावले आहेत.विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून सर्व समजघटकांच्या सेवेसाठी विधानसभेत पुन्हा काम करण्याची पुन्हा संधी द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित जनसमुदयास केले.करमाळा शहरात रॅली काढून त्यांनी सर्वांचे आशीर्वाद घेतले.अनेक संघटनानी यावेळी त्यांना पाठिंबा दिला.व्यासपीठावर जेष्ठ नेते उद्धव माळी,कन्हैयालाल देवी,गणेशभाऊ चिवटे,नागेश कांबळे,विवेक येवले, संजय घोलप, पै. अफसर जाधव,जगदीश अगरवाल,चंद्रकांत सरडे,वामनदादा बदे,शिवराज जगताप,भोजराज सुरवसे, सुहास गलांडे, विलासराव पाटील, ऍड. अजित विघ्ने, अण्णासाहेब पवार, हर्षल बागल,सुजित बागल, गौरव झाझूर्णे, सूर्यकांत पाटील,बाळासाहेब घाडगे, राजाभाऊ बाबर, हनुमंत मांढरे,भगवानगीरी गोसावी,नितीन झिंजाडे,बंडू शिंदे, बबन चांदगुडे,राजेंद्र बारकुंड,रामभाऊ पवार,कळदाते महाराज,रितेश कटारिया आझाद शेख,अशपाक जमादार,विजय पवार,दादा जाधव,पूजा माने, शीतल क्षीरसागर आदी मान्यवर होते.
टिप्पण्या