शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देऊ नका - गणेश चिवटे करमाळा डेपो मॅनेजरांना दिले निवेदन
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा - एस टी ने प्रवास करून शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देऊ नका अशी सूचना जिल्हा नियोजन सदस्य तथा भाजपचे जि सरचिटणीस गणेश चिवटे यांनी दिली आहे.करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये करमाळा एस.टी डेपोच्या काही बसेस थांबत नसल्याबाबत अनेक तक्रारी विद्यार्थी वारंवार करत असतात पण एस टी प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असते ही बाब श्री गणेश चिवटे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या सह्या सह निवेदन करमाळा एसटी डेपो मॅनेजर श्री होणराव यांची भेट घेऊन दिले व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नका अन्यथा होणाऱ्या नुकसानास आपण जबाबदार राहणार का असा सवाल उपस्थित केला.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गणेश चिवटे म्हणाले की करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी प्रवासाच्या व इतर कोणत्याही अडचणी आल्यास भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात संपर्क साधवा असे आवाहन केले.यापुढे आपण कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही असे ग्वाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली.यावेळी वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, मांगीचे युवा नेते किरण बागल, नानासाहेब अनारसे, हर्षद गाडे व विद्यार्थी उपस्थित होते,.
- चौकट -
प्रत्येक गावातील प्रवासी यांना आम्ही बसमध्ये घेणे बंधनकारक आहे परंतु काही कारणाने जर एसटी थांबत नसेल तर तशी विद्यार्थ्यांनी रीतसर तक्रार आमच्याकडे करावी आम्ही याच्यावर उपाययोजना करू
- श्री. होणराव साहेब व्यवस्थापक करमाळा आगार.
टिप्पण्या