सर्व जमाज बांधवाना सोबत घेऊन चालणारे,गणेश भाऊ चिवटे एक बहुआयामी व उदयोन्मुख युवा नेतृत्व :- नितीन झिंजाडे (खास वाढदिवस वृत्तांत)
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- समाजकारणात राजकारणात अनेक लोक आपापल्या परीने काम करत असतात.परंतु सर्वांनाच राजकारण व समाजकारणाचा समन्वय साधता येत नाही परंतु असा समन्वय साधण्याची किमया आमचे मित्र,नेते, मार्गदर्शक मा.गणेश भाऊ चिवटे यांनी साधली आहे.एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊन करमाळा तालुक्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रावर त्यांनी आपला स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.
तरुणांना एकत्र करत त्यांनी विद्यार्थी दशेपासून हिंदुत्ववादी विचारसरणी अंगीकारली.बजरंग दल संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील तरुणाची फळी उभा केली.याच फळीतील मी एक कार्यकर्ता.ही तरुणाची फौज आणखी मजबूत करायची असेल तर त्याला रोजगाराची जोड द्यावी लागेल हे त्यांनी ओळखलं व शेतीपूरक दुग्धव्यावसाय या व्यवसायाची निवड केली.सुरवातीला भाजपचे नेते आ. सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल डेअरी च्या माध्यमातून सुरवात केली.अनेक चांगले वाईट अनुभव गाठीशी बांधत आज त्यांनी दुग्धव्यावसायात जिल्ह्यात करमाळ्याचे नाव उज्वल केले आहे.या व्यवसायाच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील हजरो कुटुंबाना रोजगार उभा करून देत आपला नविन आदर्श व दबादबा प्रस्थापित केला आहे.श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमातून लोकसेवेचे वृत त्यांनी हाती घेतले आहे.अनेक सामाजिक राबवत असताना त्यांच्या लक्षात आले की,ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी करमाळा येथे रूमवर राहतात.गावातून डबा येतो परंतु संध्याकाळपर्यंत भाजी विटते,खराब होते विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते तसेच हॉस्पिटल मध्ये अनेक रुग्णांना जेवणाची सोय नसल्याने अडचण येते हे पाहून श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली तब्बल १२ वर्षे विद्यार्थी व रुग्णालयातील गरजू पेशंट यांना रात्रीच्या वेळी भात भाजी देण्याचा उपक्रम सोलापूर जिल्ह्यात एकमेव असा आहे या सर्व गरजूना संध्याकाळी भात भाजी चा आधार दिला आहे व हे काम अविरतपणे चालू आहे.याचबरोबर करमाळा शहरातील निराधार, गरजूना गेली गेली ६ वर्षे दोन वेळच जेवण देत आहेत.मुस्लिम समाजाला दरवर्षी दूध वाटप केले जाते,कोल्हापूर पूर परिस्थिती वेळी तेथील गरजूना त्यांनी मोठी मदत तिथे जाऊन केली होती.कोरोना काळात अनेक रुग्णांना रेमडिसिवीर इंजेक्शन, बेड व इतर आवश्यक उपचार जीव धोक्यात घालून त्यांनी हजारो लोकांना सहकार्य केले होते.२०१८ साली राज्य सरकार ने केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात पैसे उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातील एकमेव नेतृत्व आहे ते म्हणजे मा. गणेश भाऊ चिवटे,याशिवाय अनेक प्रकारचे साहाय्य लोकांना ते दररोज करत असतात.समुदाईक विवाह सोहळ्यातून शेकडो जणाच्या जन्मोजन्मीच्या गाठी त्यांनी बांधल्या आहेत.तालुका व परिसरातील माल्लांच्या गुणांची कदर व्हावी व कुस्ती क्षेत्राच संवर्धन व्हावं या दृष्टीने दरवर्षी कुस्त्यांचा आखाडा भरवतात.यांचबरोबर तालुक्यातील माल्लांची सोय व्हावी म्हणून करमाळा येथे अत्याधुनिक व्यायामशाळा बांधण्याचे नियीयोजन आहे.सर्व सोईनियुक्त व्यायामशाळेचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आहे.या अत्याधुनिक व्यायामशाळेत मल्लाना मॅट, लाल मातीतील कुस्ती व जिम मधिल व्यायाम प्रकार शिकवले जाणार आहेत.याचरोबर त्यांनी आयोजित केलेला दरवर्षीचा दहीहंडी मोहोत्सव तालुक्यात भूतो न भविष्यती असतो यामुळे गणेश चिवटे हे सर्व अबाल वृद्धाना आपलंस वाटणार नेतृत्व म्हणून पुढ आले आहेत.
राजकीय क्षेत्रात काम करत असताना त्यांनी आपल अस्तित्व कायमच स्वतंत्र ठेवलं आहे.सत्ता असो किंवा नसो भाजपाचे काम त्यांनी एक वृत म्हणून कायमच केले आहे.तीन वेळा भाजपचे तालुकाध्यक्ष,जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ही पदे त्यांनी भूषवली व त्या त्या कार्यकाळात पदाला व लोकांना न्याय देण्याचं काम केले आहे. यामुळे पक्षाने त्यांना सध्या करमाळा माढा विधानसभा प्रमुख पदासाह जिल्हा सरचिटणीस हे महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. त्याचबरोबर मिनी आमदारकी समजल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पदही दिल आहे.या मध्यमातून तालुक्यात त्यांनी आजवर कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत.सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील,माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांची घोडदौड अविरत चालू आहे.
आज थोडीशी धन दौलत आली की लोक माजतात लोकांना त्रास देतात,महिलावर,दुसऱ्याच्या इस्टेटीवर वाईट नजर ठेवतात,अधिकाऱ्याकडून वर्गण्या गोळा करतात,२ नंबर धंदे करून लोकांना छळतात व स्वतः नेता म्हणवून घेण्याचा घाणेरडा अट्टहास करतात.या सर्व गोष्टीना छेद देत गणेश भाऊ चिवटे यांनी हजारो कुटुंबांना रोजगार दिला आहे.हे सर्व अतुलनीय आहे.
सध्या करमाळा तालुक्याला जनतेला पावलोपावली लुटणाऱ्या नेत्यांचा मोठा सुकाळ आहे यामुळे तालुक्यात विश्वासर्ह नेतृत्वाची पोकळी आहे,ही पोकळी गणेश भाऊ चिवटे नक्कीच भरून काढतील असा विश्वास वाटतो कारण दातृत्व त्यांच्या ठायी भाव बनला आहे.तालुक्यात हजारो विश्वासार्ह तरुणांची त्यांच्यासाठी बनलेली फौज हे त्याचेच प्रतीक आहे.करमाळा तालुका आता त्यांच्याकडे एका अश्वासक दृष्टीने पाहत आहे.मराठा आरक्षण प्रश्नाने सध्या राज्यात जोर धरला आहे.२०२२ साली जेव्हा हायकोर्टाने मराठा आरक्षण नाकारलं तेव्हा त्यांनी सोलापूर येथे जाऊन मोर्चा काढत निषेध केला होता त्याचबरोबर आरक्षण मागणीला पाठींबा म्हणून त्यांनी गत वर्षी दि.३० ऑक्टोबर २०२३ रोजी आपल्या वाढदिवसानिमित्ताचे सर्व कार्यक्रम रद्द करून वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जाहीर करून आपली मराठा समजविषयीची आत्मीयता व संवेदनशीलता दाखवली याबद्दल एक मराठा समाजाला नक्कीच अभिमान व जाण असेल.
त्यांच्या भावी कारकीर्दीस माझ्यासह माझ्या सर्व मित्र परिवार व आप्तेष्ट नातेवाईक यांच्याकडून मनस्वी शुभेच्छा,आई कमलाभवानी आपल्याला उदंड निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना,
धन्यवाद🙏💐🎂❤️
..........🖋️@नितीनभाऊ झिंजाडे
सरचिटणीस भारतीय जनता पार्टी करमाळा
टिप्पण्या