सालाबाद प्रमाणे गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त बिटरगाव(श्री) येथे भव्य कीर्तन महोत्सव:माजी सरपंच डॉ.अभिजित मुरूमकर यांचे उत्कृष्ट नियोजन
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- सालाबाद प्रमाणे याही वर्षी भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त व कै. बाजीराव पाटिलबुवा मुरुमकर कृपाआशिर्वादाने व हंबीरराव शंकरराव मुरुमकर (गुरुजी) यांच्या मार्गदर्शनाने बिटरगाव(श्री) ता. करमाळा येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बिटरगाव श्री चे माजी सरपंच डॉ.अभिजित मुरूमकर व त्यांचे सहकारी यांनी यासाठी उत्कृष्ट नियोजन केले आहे.या कीर्तन महोत्सवासाठी करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम, पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष यादव साहेब आदींची उपस्थिती लाभणार आहे.तसेच विनापूजन,कलशपूजन,दीपपूजन,ग्रंथापूजन,मृदूंगपूजन, ध्वजपूजन व टाळपूजन विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
सदर कीर्तन महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवार २५ सप्टेंबर ते बुधवार ३० सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी ९ ते ११ या दरम्यान होणार आहेत.यासाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार कीर्तनसेवा बजावणार आहेत.यामध्ये शुक्रवार दि.२५ रोजी हभप समाधान महाराज शर्मा,शनिवार दि.२६ रोजी हभप विशाल महाराज खोले, रविवार दि. २७ रोजी हभप रामाचार्य रामराव ढोक महाराज, सोमवार दि.२८ रोजी हभप अनिल महाराज तुपे,मंगळवार दि. २९ रोजी हभप भगवताचार्य रुपालीताई सवने महाराज, बुधवार दि. ३० रोजी समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, गुरुवार दि. ३१ रोजी भगवताचार्यबाळू महाराज गिरवावकर यांचे काल्याचे कीर्तन सकाळी १० ते १२ यावेळी होणार आहे व यानंतर महाप्रसाद होणार आहे.
या कीर्तन महोत्सवाठी पारायण सेवा ह.भ.प. हनुमंत मुरुमकर,विठ्ठल बोराडे, वसंतसिंग रजपूत तुळशिराम काळे, अमित कुलकर्णी करणार असून हनुमान भजनी मंडळ (पोथरे),वडगाव भजनी मंडळ,आळजापूर भजनी मंडळ,तरटगांव भजनी मंडळ,बाळेवाडी भजनी मंडळ,कामोणे भजनी मंडळ,खडकी भजनी मंडळ विशेष सहकार्य करणार आहेत तर व्यासपीठ चालक म्हणून मृदूंगचार्य नाना पठाडे महाराज सेवा करणार आहेत.तरी या कीर्तन महोत्सवासाठी जास्ती जास्त लोकांनी उपस्थिती राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. अभिजित मुरूमकर, समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ बिटरगाव श्री यांनी केले आहे.
टिप्पण्या