भाजपा निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणार : देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांची गणेश चिवटेंना ग्वाही (गणेश चिवटेंच्या भूमिकेमुळे करमाळ्यातील राजकीय वातावरण निघाले ढवळून)
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
मुंबई :- भाजपा पक्ष निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पाठीशीच राहणार व त्यांच्यावर कोणताही अन्याय करणारा निर्णय देणार नाही अशी ग्वाही भाजपाचे नेते,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांना दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,करमाळा विधानसभा निवडणुकीत महायुतीचे तिकीट घेण्यासाठी इच्छुकांची मोठी रस्सीखेस सुरू आहे.गणेश चिवटे यांनी भाजपाचे काम गेली २०-२५ वर्षे अविरतपणे केले आहे.पक्ष संघटना त्यांनी मजबूत केली आहे.आज भाजपाची ताकत करमाळा विधानसभा मतदारसंघात लक्षानीय व निर्णायक आहे.असे असताना काही मंडळी भाजपच्या संघटनेला डावलून तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.त्यामुळे पक्ष संघटनेने गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात करमाळा भाजपाची टीम मुंबई येथील सागर बंगल्यावर बोलावून येथील राजकीय परिस्थिती माहिती घेतली.बागल गट भाजपा मध्ये आल्यापासून पक्षाची ताकत वाढलेचे वरकरणी दिसत असले तरी लोकसभेला बागल गट सोबत असूनही मोठ लीड भाजपच्या विरोधात गेल होत त्यामुळे बागल पक्षप्रवेशाचा लोकसभेला तितकासा फायदा झाला नव्हता. त्यामुळे या विधानभेला महायुती तिकीट वाटपात करमाळ्याची जागा भाजपाला मिळाल्यास भाजपा सरचिटणीस गणेश चिवटे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे,भाजपा महाराष्ट्र निवडणुक समन्वयक रावसाहेब दानवे यांच्यासोबतही यावेळी महत्वपूर्ण बैठका झाल्या.
गणेश चिवटे यांच्या या विधानसभेतील एंट्रीने मतदार संघातील वातावरण ढवळून निघाले आहे.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल,सरचिटणीस काकासाहेब सरडे,जिल्हा चिटणीस विनोद महानवर, गणेश महाडिक,नाना अनारसे आदी उपस्थित होते.
टिप्पण्या