महाराष्ट्रात देवेंद्र इज बॉस...फडणवीस विधानसभा गाजवणारच
महाराष्ट्रात देवेंद्र इज बॉस.....विधानसभाच गाजवणारच
स्पेशल रिपोर्ट
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
मुंबई : (प्रतिनिधी) राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागणार,त्यांच्यावर देशस्तरा वरील पक्षाची जबाबदारी जबाबदारी सोपवणार वगैरे वगैरे अनेक बातम्यानी मध्यंतरी रान उठवले होते.आता राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे.अशात राज्यातील भाजप उमेदवारांच्या तिकीट वाटपाचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना देण्यात आले आहेत.भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे.भाजपची कोअर कमिटीची बैठक रविवारी पार पडली यावेळी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले,देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यांना संपूर्ण अधिकार देऊन पुढील तिकीट वाटप प्रक्रिया सुरू केल्याची भूमिका भाजपने स्पष्ट केली आहे.भाजप प्रदेश कार्यालयात कोअर कमिटीची बैठक रविवारी पार पडली असून यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्र विधानसभा प्रभारी भूपेंद्र यादव,सह संघटन मंत्री शिवप्रकाश, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार,राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे,आ.पंकजा मुंडे आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आमच्या सर्व मित्र पक्षांसोबत बैठका होत असून विधानसभा निवडणुकाचे नियोजन आणि त्यासोबत जागावाटप हा कार्यक्रम सुद्ध ठरला आहे हे भाजपा पक्षाने स्पष्ट केले आहे
🟣महायुतीचे महानायकही फडणवीसच
महायुतीमधील सर्व पक्षाच्या आणि नेतृत्वांच्या जागा निश्वित करण्याचा निर्णय झाला आहे आमच्या सर्व मित्र पक्षांसोबत बैठका होतच आहेत. विधानसभा जिंकण्याचे नियोजन आणि त्याचसोबत जागावाटप हो कार्यक्रम सुद्धा ठरला आहे.हे संपूर्ण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू करण्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
- आशिष शेलार, अध्यक्ष मुंबई भाजपा
टिप्पण्या