श्रमिक बांधकाम कामगारांना शुक्रवारी मोफत भांडी वाटप :- श्रीराम प्रतिष्ठान व भाजपा कामगार आघाडीचा संयुक्त उपक्रम

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- श्रमिक बांधकाम कामगारांना शुक्रवार, दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वा. गायकवाड चौक करमाळा येथे मोफत भांडी वाटप करण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या बांधकाम विभागाच्या योजनेतून हा लाभ देण्यात येणार आहे.
करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजपा नेते गणेश चिवटे व भाजपा बांधकाम कामगार आघाडी यांच्या विशेष प्रयत्नातून बांधकाम कामगारांची मोफत नोंदणी करण्यात आली होती. यानुसार नोंदीत व पात्र कामगारांना ३० गृह उपयोगी भांड्याचा सेट देण्यात येणार आहे .विशेष म्हणजे यासाठी कामगारांना कोणताही खर्च करावा लागला नाही. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर येथील आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहनजी डांगरे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोदजी घुगे साहेब हे असणार आहेत अशी माहिती श्रीराम प्रतिष्ठानच्या टिमने व भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.  
या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त कामगारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कामगार आघाडीचे
गणेश माने, सुनिल नेटके,दिलीप चव्हाण,सतीश कोल्हे,सुनील आल्हाट,पप्पू मंडलिक, दादासाहेब कडू व श्रीराम प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल