श्रीराम प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य कौतुकास्पद - दुय्यम निबंधक कोकाटे
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा -श्रीराम प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असलेचे मत करमाळा येथील दुय्यम निबंधक अधिकारी श्री.अरविंद कोकाटे साहेब यांनी व्यक्त केले आहे.श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजनेमध्ये सेवा पंधरवडा निमित्त त्यांनी अन्नदान केले,यावेळी त्यांच्या हस्ते निराधार वृद्ध नागरिकांना जेवण देण्यात आले.यावेळी अधिक बोलताना श्री कोकाटे म्हणाले की,गणेश भाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा शहरात श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे अन्नदान केले जाते ही खूप कौतुकाची बाब असून वृद्धांसाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी ती गरजेची व महत्त्वाचं आहे.याची जाणीव श्रीराम प्रतिष्ठान व गणेश भाऊ चिवटे यांनी करून घेतली आहे,त्यांच्या या सामाजिक कार्याचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.मी व माझ्या सहकाऱ्यांकडून आम्ही नेहमीच अशा सामाजिक कार्यास मदत करू असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
यावेळी कोकाटे साहेब यांचे आभार श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे , सदस्य विलास आबा जाधव, संग्रामसिंह परदेशी , काकासाहेब सरडे, प्रमोद फंड, जयंत काळे पाटील , रजिस्टर ऑफिसचे रामदास देवकर साहेब , महादेव गोसावी, संतोष जवकर आदी मान्यवरांनी केले.
टिप्पण्या