अखेर प्रतीक्षा संपली...राज्यातील मुलींना व्यावसायिक उच्चशिक्षण मोफत देणारं महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य.....शासन निर्णय जारी
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
मुंबई :- OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना राज्य सरकारनं मोठी भेट जाहीर केली आहे.OBC, SEBC, EWS संवर्गातील मुलींच्या उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलतीचा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबतचा शासन निर्णय आज ०८/०७/२०२४ रोजी जारी करण्यात येऊन यासाठी ९०६.०५ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाला होता.आता लगेच याच शैक्षणिक वर्षात अंमलबजावणी सुरु होणार आहे.आता केवळ मेडिकलच नाही तर अभियांत्रिकी, फार्मसी, मॅनेजमेंट, लॉ अशा विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थिनी याचा फायदा होणार आहे.प्रत्येक अभ्यासक्रम आणि कॉलेजची फी वेगवेगळी असते. कॉलेजची फी किती आहे, याचा विचार करून पालक प्रवेशाचा प्राधान्यक्रम ठरवतात.गुणवत्ता असूनही काही विद्यार्थिनिंना पैशाअभावी शिक्षणाबाबत तडजोड करावी लागत होती. शासनाच्या यां फि माफिच्या धोरणामुळे मुलींना शिक्षण घेताना मोकळीक मिळणार आहे.याबाबतची अखेर प्रतीक्षा संपली असून शासन निर्णय आज जारी झाली आहे.आता राज्यातील मुलींना व्यावसायिक उच्चशिक्षण मोफत देण्याबाबत महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे.
🟣शासन निर्णय
टिप्पण्या