विधानसभेच्या दृष्टिने कार्यकर्त्यांनी कामाला लागा :आ.सुभाष(बापू) देशमुख (संघटनात्मक निवडी:ता.सरचिटणीस पदी नितीनभाऊ झिंजाडे तर अमोल पवार युवा मोर्चाचे नूतन तालुकाध्यक्ष)

करमाळा:-(प्रतिनिधी) विधानसभेच्या दृष्टिकोनातून करमाळा तालुक्यात कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन माजी सहकार,पणन व वस्त्रोद्योगमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष(बापू) देशमुख यांनी मौजे देवळाली ता.करमाळा येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले आहे.या मेळाव्याचे आयोजन भाजपा सोलापूर जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी केले होते,या मेळाव्यामध्ये आमदार सुभाष बापू देशमुख पुढे म्हणाले की,भारतीय जनता पार्टी व महायुती सरकारने आतापर्यंत केलेल्या लोक उपयोगी योजना आणल्या आहेत.आताच झालेल्या अर्थसंकल्प जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना,मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण,दिंड्याना अनुदान,शेतकऱ्यांना वीजबिल माफी व यापुढे मोफत वीज, तीन गॅस मोफत इत्यादी महायुती सरकारच्या योजना जास्तीत जास्त तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, बुथ प्रमुख यांनी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत व येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून करमाळा तालुक्यात कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना केल्या,यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार म्हणाले की,भाजपची तळागाळातील फळी मजबूत असेल तर पक्ष आपली नक्कीच दखल घेऊन आपल्याला न्याय देईन,जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे म्हणाले की,लोकसभेला विरोधक फेक नरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी झाले,लोकांना खोटं बोलून मतं मिळवण्यात त्यांना यश आले असून सोशल मीडियातील फेक नरेटिव्ह खोडून काढण्यात आपण अपयशी झालोत परिणामी रणजिसिंह नाईक निंबाळकर सारख्या कर्तृत्वान नेत्याचा पराभव झाला.भाजपचे दिग्विजय बागल म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचे अपयशाला प्रत्येकाने आधी स्वतःला जबाबदार धरले पाहिजेत,यावेळी उमेश मगर,संजय घोरपडे आदींची भाषणे झाली.
यावेळी संघटनात्मक दोन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या यामध्ये सरचिटणीस पदी नितीनभाऊ झिंजाडे तर अमोल पवार यांचेकडे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे नूतन तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांनी मानले तर सुत्रसंचलन विनोद महानवर यांनी केले.
यावेळी भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आ. सुभाष देशमुख यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
या कार्यक्रमासाठी जिल्हा उपाध्यक्ष अफसर तात्या जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, काकासाहेब सरडे, शशी कल्याणी,डॉ .अभिजीत मुरुमकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल पवार, देवळालीचे शहाजी पाटील, संदिपान कानगुडे, भैया गोसावी, नितीन कानगुडे, सचिन कानगुडे, लखन शिंदे, धनंजय चोपडे,रेणुका राऊत,पूजा माने यांसह करमाळा तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटातील भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल