मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाला मोठ यश,अमृत२ योजनेतुन महाराष्ट्राला मिळणार ३१हजार ७२२ कोटी रुपये मंजूर. (फलटण व पंढरपूर या शहरांचा होणार कायापालट)

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
दिल्ली :-माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाला मोठ यश आलं असून अमृत २ योजनेतुन महाराष्ट्रासाठी ३१हजार ७२२ कोटी रुपये मंजूर केंद्र सरकारने मंजूर केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन केंद्रीय शहर विकास मंत्री हरजित सिंग पुरी यांच्याकडे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण व पंढरपूर या शहरासाठी केंद्र शासनाच्या अमृत २ या योजनेअंतर्गत समावेश व्हावा व या दोन्ही शहरांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती.या मागणीची २०२४च्या बजेट मध्ये अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी दखल घेऊन पंढरपूर व फलटण या शहराचा समावेश अमृत २ या योजनेमध्ये केला आहे.फलटण व पंढरपूर शहराच्या दुष्टीने ही आनंदाची बातमी आहे.अमृत २ या योजनेनुसार महाराष्ट्राला 31 हजार 722 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.याबद्दल माजी खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय शहरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची काल दिल्ली येथे भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत.
या योजनेच्या अंतर्गत राज्यातील ७३ शहरांसह माढा लोकसभा क्षेत्रातील फलटण व पंढरपूर या शहराचा पुढील २० वर्षाचा पूर्ण डीपी प्लॅन तयार होणार आहे.या शहराची वाढती लोकसंख्या विचारात व घेऊन शहराला पुरेल एवढे पाणी कसे उपलब्ध होईल,त्यासाठी लागणारे पाणी चे नियोजन व वितरण व्यवस्था त्यासाठी टाक्या,पाईप लाईन,प्रत्येक घरात नळ कनेक्शन ,त्याच्यामध्ये शहराला पुरेल एवढा पाण्याचा बॅलन्स टॅंक,अंतर्गत रस्ते,ड्रेनेज व्यवस्था , अंतर्गत पूर्ण पाईपलाईन ,प्रत्येक घराला नळाचे कनेक्शन,सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारे प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया करून शहरातील झाडे जगवणयासाठी योजना,जनतेला पाण्याचे महत्व समजण्यासाठी जनजागृती,त्यासाठी शिक्षाणाची व्यवस्था या गोष्टीचा विकास करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल