लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण झालं आणखी सोपं,अनेक अटी शर्ती महायुती सरकारकडून रद्द
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
मुंबई :- लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात तारांबळ उडत असल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास तत्परतेने आलं आहे.त्यामुळे या योजनेचा लाभ घेण आणखी सोपं व्हावं यासाठीच अनेक अटी शर्ती महायुती सरकारकडून रद्द करण्यात आल्या आहेत.राज्यातील लाभार्थी महिलांना सोप्या माध्यमातून या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने आता कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे.त्यामुळे महिलानी राज्य सरकारचे जोरदार स्वागत करून अभिनंदन केले आहे.
🟣नवीन बदल खालीलप्रमाणे आहेत.
१)या योजनेच्या लाभसाठी आता लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र (डोमासाईल) उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरता येईल.
२)या योजनेत पाच एकर शेतीची अट आता रद्द करण्यात आली आहे.
३)या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 असा होता.आता हा वयोगट 21 ते 65 असा करण्यात आला आहे.
४)परराज्यात जन्म झालेल्या परंतु महाराष्ट्रातील पुरुषासोबत लग्न झालेल्या महिलाही आता या योजनेसाठी आपल्या पतीचे कागदपत्र जोडून अर्ज करू शकणार आहेत.
५)रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
६)सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला/मुलीला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे
टिप्पण्या