मोदी सरकारचा पहिलाच निर्णय शेतकऱ्यांसाठी ;१८जूनला काशीमधून डिबीटी द्वारे जमा करणार pm किसान निधीचे २००० रु
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारताच त्यांनी शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.श्री.मोदी यांनी PM शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे.यांतर्गत किसान सन्मान निधीचे 2000 रु.18 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 17 व्या हप्त्याचे पैसे काशीमधून योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात सोडणार आहेत. शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या या योजनेच्या 16 हप्त्यांमध्ये आतापर्यंत 12 कोटी 33 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना 3 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम डीबीटीमधून थेट वितरित करण्यात आली आहे.या निर्णयामुळे आता देशातील कोटयावधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये थेट येणार आहेत.
सध्या शेतात खरीप हंगाम पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग चालू आहे.अशातच बी बियाणे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकरी पैशांची जुळवाजुळव करत आहेत, असे असतानाच आता पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना या पैशांची मदत होणार आहे.मात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांनी KYC करून घेतली पाहिजेत.
शेतकरी सन्मान निधीचा फायदा देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील शेतकरी या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 17 व्या हफ्त्याची वाट पाहात होते.नव्या सरकारची स्थापना होताच 17 वा हफ्ता मंजूर करण्यात आला आहे.18जून रोजी पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहेत.
🟣 असा चेक करा तुमचा हप्ता
🌸या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँक खाती आधार संलग्न करून घेणे गरजेचे आहे.
🌸तसेच बँकेत केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे.
🌸शेतकऱ्यांना https://pmkisan.gov.in वर जाऊन आपल्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचा 17 वा हप्ता जारी झाला की नाही? हे तपासून घेऊन शकतात.
🌸तसेच यासंदर्भात काही अडचण असल्यास हेल्पलाइन 1800-115-5525 वर संपर्क करु शकतात.
टिप्पण्या