रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी धैर्यशील मोहितेंना माळशिरसमध्ये रोखले पण,माढा करमाळ्यात झाला घात...... (केंद्रात सत्तेचा गड आला पण माढ्यातला सिंह हरला की हरवला..?)

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- २०२४ ची पार पडलेली निवडणूक ही एकूणच देशाच्या दृष्टीने दिशादर्शक ठरली.माढा लोकसभा मतदार संघातील लढतीकडे तर देशाचे लक्ष लागले होते.सुरवातीला UPA आघाडीला माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार मिळतो की नाही अशी परिस्थिती होती.भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करून निवडणुकीत आघाडी घेतली.राष्ट्रवादी(शप) चे सर्वोसर्वा शरद पवारांनी भाजपमधील धैर्यशील मोहिते पाटील यांना तुतारीकडे वळवत निवडणुकीत रंग भरला.या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी १ लाख २० हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवत भाजपासह माढा लोकसभेतील महायुतीला जबरदस्त धक्का दिला आहे.
माण-खटाव,फलटण, माढा,सांगोला, करमाळा, माळशिरस व पंढरपूरचा काही भाग असा मिळून माढा लोकसभा मतदारसंघ आहे.धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपचे जिल्हा संघटन मंत्री असताना भाजपाकडून उमेदवारीसाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती.याकडे माढ्याच्या शिंदे बंधूनी जास्तच गंभीर्याने पहिले.माढा करमाळा मधून तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिल्यास तब्बल २ लाखाचे लीड देऊ असे जाहीर करून राजकीय ध्रुवीकरण केले.
माढा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर सर्वच मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत.यामध्ये फलटण मध्ये स्वतः रणजितसिंह नाईक निंबाळकर,राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर, आम.दीपक चव्हाण, मान फलटणचे आमदार जयकुमार गोरे, माळशिरसमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील,आमदार राम सातपुते, उत्तम जानकर,सांगोल्यात आम. शहाजीबापू पाटील,माजी आम.दीपक आबा साळुंखे,माढ्यातून आम. बबनदादा शिंदे, रणजित शिंदे, संजयमामा शिंदे तर करमाळा मधून माजी आमदार जयवंतराव जगताप,रश्मी बागल, गणेश चिवटे, पंढरपूर मधून मा.आ.प्रशांत परिचारक,कल्याण काळे व आभिजीत पाटील यासह अनेक छोटे मोठे गट,पुढारी पदाधिकारी यांचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना समर्थन होते तरीही मोठ्या मताधीक्याने पराभवला त्यांना सामोरे जावे लागले आहे.
निंबाळकर यांना पडलेल्या मतांचा विचार करता निंबाळकर यांना मान-खटाव,फलटण, सांगोला व मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यातील माळशिरस मध्ये ही चांगल मतदान मिळवलेल दिसून येत आहे.आ.शहाजीबापू पाटील व दीपकआबा साळुंखे यांनी सांगोल्यात मोहितेना फार मोठ मताधिक्य मिळवू दिले नाही.फलटण मध्ये रामराजे गटाचा प्रखर विरोध असताना रणजितसिंह नाईक निंबाळकरांना फलटणकरांनी मताधिक्य देत चांगली साथ दिली.माण खटाव मध्ये आ.जयकुमार गोरेंनी निबाळकरांसोबतचा दोस्ताना निभावत मोठ लीड दिले आहे.रणजितसिंह निंबाळकरांची खरी गोची म्हणा किंवा घात म्हणा झाला तो माढा व करमाळा मतदारसंघात झाला.माढ्याच्या शिंदे बंधूनी देऊ केलेले २ लाख मतांचा लीडचा आकडा ते देऊ शकले नाहीत व निंबाळकरांचे गणित येथेच चुकले,त्यांना माढा करमाळा मधून किमान ६५-७० हजार मतांचे लीड मिळणे अपेक्षित होते पण घडले उलटेच धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा करमाळा मध्ये तब्बल ९३ हजार मताहून अधिक जास्तीचे मताधिक्य मिळाले.माढा करमाळ्यात निंबाळकर यांचा प्रचार करणारे हे मातब्बर होते. पण त्यापैकी अनेकांचे गाव पातळीवरील कार्यकर्ते उघडणे तुतारीचा प्रचार करत होते.याचा सर्वात मोठा फटका निंबाळकर यांना या दोन तालुक्यातून बसला असे बोलले जात आहे.
भाजपाला या दोन तालुक्यात लोकांनी का नाकारले, प्रचार यंत्रणा कुठे व का चुकली यावर नक्कीच मंथन करून निर्णय करावा लागणार आहे.माढ्यात निंबाळकर हारले पण केंद्रात महायुतीचे सरकार सत्तेत आले.केंद्रात सत्तेचा गड आला पण माढ्यातला सिंह हरला की हरवला याबद्दलची लोकात चर्चा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल