बालकामगार निर्मूलन करण्यासाठी शासनाची भूमिका उदासीन ;लोकांनी पुढे येऊन बालकांना यातून मुक्त केले पाहिजे:प्रमोद(बाबा) झिंजाडे (बालकामगार मुक्त गाव ठराव करणारी मौजे पोथरे ठरली देशातील पहिली ग्रामपंचायत)

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
पोथरे :- बालकामगार निर्मूलन करण्यासाठी शासनाची भूमिका उदासीन ;लोकांनी पुढे येऊन बालकांना यातून मुक्त केले पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी व्यक्त केले आहे. याबाबत करमाळा तालुक्यातील मौजे पोथरे आज (दि. १२)रोजी जागतिक बालकामगार दिनानिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, वय वर्ष १४ पेक्षा कमी वयाच्या बालककांना कामाला लावणे हा कायद्याने गुन्हा आहे तरीही आज मोठ्या प्रमाणात शेती,ऊसतोड, विविध चहाची दुकानें,कापड व तत्सम दुकानें आदी ठिकाणी बाल कामगार आढळून येतात.दिल्लीपासून ग्रामपंचायत पर्यंत बाल कामगार मुक्त करण्यासाठी कायदा आहे पण प्रभावी यंत्रणा नाही.यासाठी गाव पातळीवरील लोकांनी पुढे येऊन माझं गाव बालकामगार मुक्त गाव करण्यासाठी पुढाकार घ्यायला लागेल.बालमजुरी रोखण्यासाठी लोकांनी पुढे येऊन बालमजुरी विरोधात तक्रार करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी,सोलापूर अतुल वाघमारे (मो. नं. 7219104503) यांच्याकडे तक्रार करण्याचे सुचविले तसेच ग्रामबालहक्क समितीला कळवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पोथरे निलज ग्रुप ग्रामपंचायत याबद्दल चा ठराव करणारी पहिली देशातील ग्रामपंचायत ठरली हे आपल्या सर्वासाठी अभिमानास्पद बाब आहे.सदर या 
 १)ग्रामसभेत बाल कामगार मुक्त गाव घोषित करणे.
२) ग्राम बालहक्क समिती स्थापन करणे यासाठी ग्रामपंचायतिचे ठराव मंजूर करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत तर्फे विद्यार्थ्यांसाठी खुली अभ्यासिका चालू करणे, इयत्ता १० वी १२ ला गावात उत्तम गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणे आदी बाबी ठरवण्यात आल्या.

यांतर्गत महात्मा गांधी विद्यालय करमाळा मध्ये इयत्ता १० वी मध्ये ९१% गुण मिळवत उत्तीर्ण, झालेल्या ऋतुजा राणी-नितीन झिंजाडे या विद्यार्थिनीचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या विद्यार्थिनीला प्रोत्साहन म्हणून ग्रामपंचायतचे सरपंच अंकुश शिंदे व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांचेतर्फे प्रत्येकी १०००रु बक्षीस देण्यात आले.यावेळी बाल ग्रामसंरक्षण समिती स्थापन करण्यात आली.यावेळी एकलव्य आश्रम शाळेचे प्रमुख रामकृष्ण माने,नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड, एपीआय रोहित शिंदे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब टकले, बालविकासचे शहाजहान मुलाणी,भाग्यश्री खटके,सीआरपी नुतन शिंदे, दादासाहेब झिंजाडे,यांनीही आपल्या मनोगतातून बालमजुरी विरोधात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला बीट हवालदार बालाजी घोरपडे, अंगणवाडी प्रकल्प पर्यवेक्षिका सुजाता कांबळे, उपसरपंच दिपाली जाधव, मा. सरपंच संगीता खराडे,उमेद प्रकल्पाचे जगताप साहेब,शेवाळे साहेब, मस्तुद साहेब,योगीता शिंदे-पाटील,राणी झिंजाडे, संगीता झिंजाडे, मनीषा पाटील, प्रियांका शिंदे, माया शिंदे, उषा आढाव, शोभा झिंजाडे,मिरा नायकोडे,दिपाली दळवी,ग्रा.सदस्य संतोष ठोंबरे,रासपचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते,माजी सरपंच ज्ञानदेव नायकोडे, निलज पोलिस पाटील शंकर राऊत,भाजपचे मिडीया प्रमुख नितीनभाऊ झिंजाडे,पाराजी शिंदे,कृषी साहाय्यक नितीन जाधव,मा. सरपंच जयद्रथ शिंदे, अजिनाथ झिंजाडे,धनंजय शिंदे,संदीप खटके,रावसाहेब शिंदे,सुरेश शिंदे,दादा गोसावी,रावसाहेब पाटील,अंकुश पाटील,बाळासाहेब कुलकर्णी,विलास जाधव,रामकृष्ण नायकोडे,झुंबर कडू,गणेश ढवळे,विशाल झिंजाडे,रवी जाधव,अरूण झिंजाडे,अक्षय शिंदे, धनंजय झिंजाडे,बनन जाधव यांच्यासह पोथरे ग्रामपंच पदाधिकारी,महीला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल