शेतकऱ्यांसाठी खुशखबर; १४ पिकांचा हमीभाव वाढला,. हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावर होणार कारवाई
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
नवी दिल्ली :- केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिली असून १४ शेतीपिकांच्या हमी भावामध्ये (एमएसपी) मोठी वाढ करण्यात आली आहे.नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय खरीप हंगामासाठी धानाकरिता किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ५.३५ टक्क्यांनी वाढवून प्रतिक्विंटल २३०० रुपये केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत हा निर्णय झाला. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव म्हणलो की, कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या (सीएसीपी) शिफारसी मान्य करून १४ खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमती केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केल्या.यानुसार आता खालीलप्रमाणे नविन बाजारभाव शेतकऱ्यांना मिळणार आहे.महाराष्ट्रात उडीद, तुरीचा पेरा मोठा आहे. या दोन्ही पिकांना अनुक्रमे ४५० व ५५० रु मोठी घशाघाशीत वाढ करण्यात आली आहे. तुरीला आता ७५५० तर उडीद पिकाला ७४०० रु. हमी भाव मिळणार आहे.या हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल घेणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
टिप्पण्या