वीट जलजीवन मिशनचे काम निकृष्ट दर्जाचे : हर्षद गाडे यांची झेडपी सीइओ कडे तक्रार

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- देशातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी केंद्र सरकारने जलजीवन मिशन योजना सुरु केली आहे.यानुसार गाव खेड्यातील प्रत्येक नागरिकांसाठी हजारो रुपये शासनाने उपलब्ध केले आहेत. या योजनेची कार्यान्वयन यंत्रणा जिल्हा परिषद व ग्रामपंचायत या या यंत्रणाकडे आहे.प्रत्यक्षात मात्र बऱ्याच ठिकाणी या योजनेचा बट्याबोळ झाल्याचे उघड झाले आहे.कार्यान्वयन यंत्रनेचा दुर्लक्ष किंवा हलगर्जीपणा यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपये पाण्यात जातात की काय अशी भीती निर्माण झाली आहे.फक्त पाईपलाईन उकरण,टाक्या बांधण व बिल काढणं या योजनेच उदिष्ट नसून लोकांना प्रत्यक्षात पाणी मिळण हे या योजनेच फलीत आहे व नेमक हेच होताना दिसून येत नाही हे मोठं दुर्दैव आहे.याच योजनेतील एक प्रकार करमाळा तालुक्यातील मौजे वीट येथे घडला असून याबाबत येथील हर्षद गाडे यांनी याबाबत जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार केली आहे.या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, जलजीवन योजना राबवताना प्लॅन इस्टीमेट प्रमाणे काम झाले नाही.पाईपलाईन बुजताना गावातील रहदारीचा रोड फोडला गेला आहे,इस्टीमेट प्रमाणे पाईपलाईनची खोली झालेली नाही,एयर वाल रस्त्या जवळ घेतल्याने एक्सीडेंटचा धोका निर्माण झाला आहे.रस्त्याच्या साईटला असलेली रस्त्याची साईटचारी बुजली त्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर येत आहे,साईट चारी बुजल्याने रस्त्यावर आलेले पाणी साचते आहे,जल जीवन विहीरचे काम इस्टिमेट प्रमाणे नाही.
अशा प्रकारची तक्रार त्यांनी जिल्हा परिसषद सिईओ कडे केली आहे.अद्याप पर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने याची चौकशी केलेली नाही. यामुळे या योजनेच्या कार्यक्षमतेवर परिणाम होणार असून शासनाचे हजारो कोटी रुपये पाण्यात जाण्याचा धोका निर्माण झाल्याचे श्री गाडे यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल