वीट ग्रामपंचायत प्रशासक काळातील गैरव्यावहाराच्या चौकशीला करमाळा पंचायत समिती प्रशासनाची टाळाटाळ

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- करमाळा तालुक्यातील वीट ग्रामपंचायतमध्ये नेमलेल्या तत्कालीन प्रशासकाच्या काळातील गैरव्यावहाराची चौकशी करण्याची मागणी वीट येथील हर्षद गाडे यांनी १जानेवारी २०२४ रोजी प्रशासनाकडे केली होती. तब्बल पाच महिने होऊनही चौकशी करण्यास प्रशासनाने टाळाटाळ चालवली आहे असा आरोप श्री गाडे यांनी केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,श्री गाडे यांनी गटविकासअधिकारी करमाळा यांचेकडे यासंबधी तक्रार केली होती. सदर तक्रारीनुसार सदर ग्रामपंचायत प्रशासकाने त्यांच्या अधिकारात अनेक चुकीची कामे केली आहेत,अनेक कामात मोठा फ्रॉड घोटाळे व अफरातफर झाली असलेचे म्हटले आहे तरी झालेल्या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.चौकशी न झाल्यास आपण उपोषण करणार असलेचेही त्यांनी म्हटले आहे.ही तक्रार करून तब्बल ६ महिने होत आले तरी पंचायत समिती प्रशासनाने यावर काहीही कारवाई न करता सदर प्रशासकास पाठीशी घालणेचे काम केले आहे.सदर प्रशासकावर चौकशी करून कारवाई करायचे सोडून जिल्हा परिषदेच्या कोर्टात सदर प्रशासकावर कारवाईसाठी पत्र देऊन कागदी घोडा नाचावला आहे.यामुळे पंचायत समितीचा अजब कारभार उघड झाला असून सदर प्रशासकाने केलेल्या कामाची चौकशी करून कारवाई न झाल्यास आपण तीव्र आंदोलन करणार असलेचे श्री गाडे यांनी म्हटले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करमाळा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उजनी बॅकवॉटरला ८ तास वीज, कुकडी–उजनी उपसा सिंचन सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात,माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकर

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)