हिवरेतील शेतकऱ्यांना मिळणार सुधारित वाढीव दुष्काळ निधी : गणेश चिवटे यांच्या पाठपुराव्याला यश

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- करमाळा तालुक्यातील हिवरे येथील शेतकऱ्यांना आता सुधारित वाढीव दुष्काळी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी केलेल्या पाठपुराव्यास मोठं यश आलं आहे.याबाबत अधिक माहिती आशी की,अपुऱ्या पाऊसमानामुळे सन २०२४ या वर्षासाठी राज्य सरकारने करमाळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.शासनाने शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळी मदत म्हणून अनुदान जाहीर करून त्या रकमेचे वाटपही करण्यात आले.यामध्ये हिवरे गावात दुष्काळी निधी वाटप करताना प्रशासनाकडून बागायती जिरायती फळबाग क्षेत्रासाठी निकषानुसार शेतकऱ्यांना मदत मिळाली नव्हती.ही बाब हिवरेचे माजी सरपंच उमेश मगर,युवा नेते विशाल घाडगे, अजय डवले व शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली.भाजपा नेते गणेश चिवटे यांच्या माध्यमातून प्रशासनासोबत पाठपुरावा केला.तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी याबाबत संबंधित अधिकऱ्यांना योग्य ते आदेश दिले आहेत.यामुळे हिवरे गावात दुष्काळ मदतीपासून वंचीत असलेल्या व अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना आता सुधारित वाढीव दुष्काळी मदत मिळणार आहे.ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर पेरणीसाठी जास्तीचा निधी मिळणार असल्याने हिवरे व परिसरातील शेतकऱ्यामध्ये आनंदाचे,समाधानाचे वातावरण आहे.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश चिवटे यांनी याबाबत पाठपुरावा केल्याने शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल