माझ्याशी विश्वासघात केला की,देव त्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. (मोहिते,पवार, ठाकरे यांचेवर फडणवीस,खा.निंबाळकर यांचे जोरदार टिकास्त्र)

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :-माझ्याशी विश्वासघात केला की,देव त्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अकलूज येथून केला आहे. महायुतीचे उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ अकलूज येथील विजय चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,
ज्यांचे राजकीय दुकानदारी शरद पवारांनी बंद केली अशांच्या घराण्यावर विश्वास ठेऊन त्यांचा वारसा वाचवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी,आपण ज्यांना मदत केली शेवटी त्यांनी त्यांनी त्यांचा रंग दाखवला व तेच आज पुन्हा रस्त्यावर फुलांचा दस्ता घेऊन स्वागताला येत आहेत असे मोहिते पाटील यांचे नाव न घेता ते म्हणाले.माळशिरस तालुक्यातील लोकांवर किती अन्याय अत्याचार झाले याची माहिती आता लोक देत आहेत त्यामुळे लोकांनी निर्भीडपने मतदानाला जाण्याचे आवाहन ही त्यांनी केले.माढा लोकसभेचे खासदार व उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पहिल्या पाच वर्षातील दोन अडीच वर्षात एवढी विकासकामे केली त्यामुळे बारामतीकर चवताळले आहेत त्यामुळे त्यांनी रणजितसिंहाना पाडण्याचा विडा उचलला आहे परंतु आता लोक सुज्ञ झाली आहेत ते योग्य लोकांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मोहिते परिवाराला विरोध म्हणून माळशिरस मधील जनता उत्तम जानकर यांच्या मागे होती.उत्तम जानकर संघर्ष करतील असा त्याचा विश्वास होता पण त्यांनी संघर्ष करण्याऐवजी समझोता केला असे म्हणत बोलका पोपट म्हणून उत्तम जानकर यांच्यावरही त्यांनी बोचारी टीका केली. यावेळी व्यासपीठावर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मातोश्री पद्मजादेवी मोहिते पाटील यांची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी धवलसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील व शरद पवार यांच्यावर जोरदार शब्दात टीका करत अवेशपूर्ण भाषण केले.राज्य व केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनाची माहिती त्यांनी यावेळी दिली.मोहिते पाटील परिवाराने माळशिरस तालुक्यातील जनतेचे विविध संस्थामार्फत बुडवलेले पैसे याची यादीच वाचून दाखवली.माळशिरस तालुक्यातील मागास ५४ गावासह धनगर समाजावर झालेला अन्याय त्यांनी यावेळी सांगितला.यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,खासदार झाल्यावर मी पहिलं काम काय केले असेल तर बेकायदेशीरपने बारामतीला जाणारे माळशिरस तालुक्याचे हक्काचे पाणी स्वतःच्या हाताने बंद केले.गेली एक दोन वर्षांपासून भाजपामध्ये राहून पक्षाच्या विरोधात काम करणारे मोहिते परिवाराला आपण ओळखले होते.मी त्यांना न भीता इथं पक्षाचे काम करत राहिलो लोकांना मदत केली.आपण त्यांना व त्यांचा बारामतीचा बाप यांनाही भीत नसलेच त्यांनी यावेळी सांगितले.पवार-मोहिते भाषणात सांगतात मोदींनी व शिंदे फडणवीस यांनी विकासकामे केली नाहीत.त्यांनी माढा लोकसभेत असा माणूस आणून दाखवावा जो सरकारी योजनेच्या लाभार्थी नाही असे जाहीर आवाहन त्यांनी यावेळी केले.असा लाभ झालेला मनुष्य त्यांनी दाखवावा याच चौकात आपण पवार-मोहिते यांचा सत्कार स्वखर्चाने याच विजय चौकात करू असेही ते म्हणाले.परवा मंगळवार दि.३० एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माळशिरस येथील शेती महामंडळाच्या जागेत विराट सभा होणार आहे या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याच आवाहन खा. निंबाळकर यांनी केले आहे.या सभेचा संपूर्ण व्हिडीओ https://www.facebook.com/MP.Ranjeetsingh/videos/1961420380945967/?mibextid=NnVzG8 येथे पोस्ट झाला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल