खा.रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारार्थ तरुणाने डोक्यावरील केसात चक्क कोरले कमळ....
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- आपला पक्ष नेते यांच्यावरील प्रेमापोटी कार्यकर्ते अनेक युक्त्या लढवून आपल प्रेम व्यक्त करत असतात.असेच प्रेम व्यक्त करणारा एक अवलिया करमाळा शहरात आहे.खासदार रणजितसिंह नाईक निबांळकर यांच्या प्रचारार्थ करमाळ्यातील एका स्टार प्रचारकाने श्री गणेश जगताप या कार्यकर्त्याने आपल्या डोक्यावरील केसावर चक्क भारतीय जनता पार्टी पक्षाचे निवडणूक चिन्ह कमळ कोरले आहे.आपल्या डोक्यावरील केसात कमळ चिन्ह कोरून भाजपचा एक अनोखा प्रचार सुरू केला आहे त्यामुळे करमाळा परिसरात हा एक चर्चेचा विषय ठरला आहे.गणेश जगताप हा एक गरीब कुटुंबातील कामगार असून मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनामुळे गरीब लोकांना योजनाचा लाभ थेट झाल्याने त्यांचे जीवनमान सुधारले आहे,त्यामुळे आपण भाजपा व कमळ चिन्हाचा प्रचार आपण करत आहे.
टिप्पण्या