पोथरेत उमेद गटाच्या महिलासाठी कार्यालयाचे भूमिपूजन संपन्न


(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :- महाराष्ट्र सरकारच्या सुरु असलेल्या उमेद प्रकल्पातंर्गत करमाळा तालुक्यातील पोथरे येथे महिला बचत गटातील महिलासाठी कार्यालयाचे भूमिपूजन आज संपन्न करण्यात आले.पोथरे गावचे विद्यमान सरपंच अंकुश शिंदे यांच्या शुभहस्ते सदरचे भूमिपूजन पार पडले. पोथरे येथे उमेदचे ६२ महिला बचत गट व प्रगती व समृद्धी असे दोन ग्रामसंघ यशस्वीरित्या कार्यरत आहेत
उमेद अंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून ६००-७०० महिला शासनाच्या उपक्रमाशी थेट जोडल्या गेल्या आहेत.प्रत्येक महिला बचत गटाला सुरवातीला १५ हजार रु. भागभांडवल शासनाने दिले होते व अलीकडेच आणखी १५ हजार रु.चे भागभांडवल शासन देत आहे. यामुळे महिला आर्थिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी उमेद प्रकल्पाचा फार मोठा हातभार लागत आहे.
पोथरे येथील महिलांचा या प्रकल्पात फार मोठा सहभाग असलेने मासिक मिटिंग घेणेसाठी महिलांची जागेअभावी अडचण होत होती.या नवीन कार्यालयामुळे ही अडचण दूर झालेने महिलांची फार मोठी गैरसोय दूर होणार आहे.या कार्यालयासाठी राज्य सरकारने ५ लाख रु. निधी उपलब्ध करून दिला आहे.या कार्यालयाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी उमेद प्रकल्पाच्या सिआरपी,लिपिका,कृषी सखी, बँक सखी,लिपिका,बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव, सदस्य यांनी पाठपुरावा केला होता.या भूमीपूजम कार्यक्रमासाठी उमेद गटाचे कर्मचारी श्री.नरसाळे,पोथरे गावचे ग्रामसेवक हरिभाऊ दरवडे,नितीन झिंजाडे,पाराजी शिंदे,अंगद देवकते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.हा कार्यक्रम पार पाडणेसाठी माया शिंदे,उषा आढाव,नूतन शिंदे,प्रियांका शिंदे, राणी झिंजाडे,मनीषा पाटील,अश्विनी घोडके,संगीता पाटील व उपस्थित बचत गटाच्या सर्व महिलांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल