वीटमध्ये विकास कामांचा डोंगर,खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भरघोस मतदान मिळणार : हर्षद गाडे
वीट :- करमाळा तालुक्यातील मौजे वीट गावात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर त्यांना भरघोस मतदान मिळणार असेलचा दावा भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष हर्षद गाडे यांनी केला आहे.याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की,करमाळा तालुक्यातील मौजे वीट येथे माढा विभागाचे खासदार विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्हा नियोजन सदस्य गणेश(भाऊ) चिवटे यांच्या विकास निधीमधून कोट्यावधी रुपयांची विकास कामे झाली आहेत.
यामध्ये
१)वीट-उमरड रोड ९ कोटी रु.,
२)वीट-देवळाली रोड १५ लाख रु.,
३)वीट-चोपडे वस्ती रस्ता १० लाख रु,
४)वीट - बरडे वस्ती १० लाख रु,
५)इनामदार फार्म ते आढळे वस्ती ६ लाख रु,
६)गाडे वस्ती ते ढेरे वस्ती ६लाख रु,
७)कैकाडी मळा २लाख रु,
८)राघू चांदणे ते कोंडाबाई चांदणे घर रस्ता ७ लाख रु,
९)रेवन्नाथ मंदिर पत्रा शेड वा घाट बांधणे ७लाख रु
१०) आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती ७ लाख रु,
११)दलित वस्ती पेवर ब्लॉक रोड ४लाख रु,
१२) दलित वस्ती स्मशानभूमी ४लाख रु,
१३)शाळा दुरुस्ती ७लाख रु,
१४) भोसले वस्ती डीपी ८.५ लाख रु,
१५)हनुमंत आवटे डीपी ८.५ लाख रु,
१६)स्ट्रीट लाईट दिवे १०- २.५ लाख,
१७)नवीन स्ट्रीट दिवे मंजूर १५,
१८)सुभाष जाधव डीपी ८.५ लाख रु आदी विकास कामे केली आहेत.
ही कामे करत असताना गावातील सर्व स्तरातील लोकांना सोबत घेऊन कामे पूर्णत्वास नेली आहेत.
याच विकास कामाच्या जोरावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विक्रमी मतदान होणार असलेचे दावा श्री हर्षद गाडे यांनी केला आहे.
टिप्पण्या