मांगी,रिटेवाडीबाबत लोकांची मागणी पहिल्यांदा कागदावर आणून,लवकरच पूर्णत्वाकडे :खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा :-मांगी,रिटेवाडीबाबत लोकांची मागणी आपण पहिल्यांदा कागदावर आणली,लवकरच या दोन्ही योजना पूर्णत्वाकडे जातील असा विश्वास माढा लोकसभा खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.शिवसेना जिल्हाध्यक्ष महेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त काल ते करमाळा येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
 रिटेवाडी योजना लोकसभा आचारसंहितेच्या अगोदर मंजूर करा अन्यथा ६० गावे मतदानावर बहिष्कार घालणार आहेत अशी रिटेवाडी उपसा सिंचन योजना कृती समितीमधील ४०सरपंचांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेकडे मागणी केली त्यावर खा. निंबाळकर बोलत होते.याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस हे मांगी व रिटेवाडी योजनेबाबत अत्यंत सकारात्मक असून राज्य सरकारने संपूर्ण कुकडी प्रकल्पाचे फेरजालनियोजन प्रस्तावित केले असून त्याचा अहवाल केंद्रीय जलशक्ती मंत्रलयात तयार होत आहे. लवकरच यावरील काम होऊन. करमाळा तालुक्याला कुकडीतील हक्काचे पाणी रिटेवाडी योजनेतून मिळणार आहे तसेच मांगी तलावाचा समावेश कुकडी प्रकल्पात होणार आहे.मतदानासाठी मी आपल्या संघर्ष समितीसोबत तात्पुरते खोटे बोलणार नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार आल्यानंतर फेरजलनियोजनाची आपण मागणी करून त्यावर काम सुरु केले होते.त्यामुळे रिटेवाडी संघर्ष समितीने गैरसमजाला बळी पडू नये.रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी मंगेश चिवटे,महेश चिवटे,माजी आमदार नारायण पाटील यांची सतत चिमट असते.याचसोबत आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही या योजनेसाठी मला केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडं पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांनीही हीच मागणी केली आहे.भाजपचे जि. सरचिटणीस गणेश चिवटे यांनीही सगळ्यात आधी जून २०२३ मध्ये शेतकऱ्यांना बरोबर घेऊन सिंचन भवन पुणे येथे कुकडीच्या फेरजलनियोजनाची मागणी केली होती.एकंदरीत मांगी तलावाचा कुकडी प्रकल्पात समावेश व रिटेवाडी योजना कार्यान्वित करण ही फक्त मागणी राहिली नसून सर्वांची लोकचळवळ बनली आहे.त्यामुळे ही योजना आपण सर्वस्व पणाला लावून करणार आहोत असे खा.निंबाळकर म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल