म्हणून आहे आज श्रीराम मंदिराचे उद्घाटन......अशी आहे प्रभू रामललाची मंगलमय मोहक मूर्ती......

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
अयोध्याधाम :आज 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर प्रदेश मधील अयोध्याधाम येथे प्रभू श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे.यासाठी खास दगडापासून बाल प्रभू श्रीरामाची मूर्ती बनवली आहे. या मूर्तीवर हिंदू धर्मातील अनन्य साधारण महत्व असणाऱ्या गोष्टी समाविष्ट आहेत.यामध्ये स्वस्तिक,ॐ, चक्र, गदा, सूर्य यासोबत भगवान विष्णुचे मत्स, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध,कल्की हे १० अवतार व रामभक्त हनुमान, गरुड यांच्याही मूर्ति यामध्ये अंतरभावित करण्यात आल्या आहेत.
प्राणप्रतिष्ठापणेसाठी 22 जानेवारी हाच मुहूर्त का निवडण्यात आला असा प्रश्न अनेकांना पडला आहे.असा प्रश्न या महाभागान अन्य धार्मियांच्या सण,उत्सवावेळी पडत नाही हे मोठं आश्यर्य आहे. तर जाणून घेऊया या दिवशी ग्रह नक्षत्रांची नेमकी स्थिती अशी आहे की,सोमवार दि.22 जानेवारी रोजी राम मंदिराच्या अभिषेकासाठी 84 सेकंदांचा अत्यंत सूक्ष्म शुभ मुहूर्त असणार आहे. हा मुहूर्त 12:29 वाजून 8 सेकंदाला सुरू होईल आणि 12:30 वाजून 32 सेकंदाला संपेल म्हणूनच 22 जानेवारी 2024 खास आहे.प्राणप्रतिष्ठा मुहूर्तावर मेष राशीचे स्वर्गारोहण होणार आहे तर गुरु मेष राशीत,चंद्र वृषभ राशीत,केतू कन्या राशीत,मंगळ-बुध-शुक्र धनु राशीत, सूर्य मकर राशीत आणि शनि कुंभ राशीत असेल अध्यात्मानुसार ग्रहांची स्थिती अतिशय धार्मिक आणि आध्यात्मिक आहे.या दिवशी मृगशीर्ष नक्षत्र असेल जे स्वतःच खूप शुभ मानले जाते.यासोबतच या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग यांसारखे शुभ योगही तयार होत आहेत.अशा परिस्थितीत प्रभू रामाच्या प्रतिमेच्या अभिषेकासाठी हा अत्यंत शुभ दिवस आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल