मांगी येथील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करणेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रकाश ननवरे यांचे निवेदन

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
फलटण :- करमाळा तालुक्यातील मांगी येथील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करणेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे प्रकाश ननवरे यांनी निवेदन दिले आहे. याबद्दल अधिक माहिती अशी की,मौजे मांगी, ता. करमाळा जि.सोलापूर या गावातील गायरान जमीन गट नं.१४२ मध्ये गावातील अनेक कुटुंबे सदर ठिकाणी गेली ४० वर्ष आधीपासून राहात आहेत.या कुटुंबियांकडे इतर कोठेही घर जागा नसून ते सर्वजण भूमिहीन शेतमजूर आहेत.असे असताना करमाळा तहसिल कार्यालयाने संबंधीत सर्व कुटुंबियांना नोटीस देऊन राहती घरे अतिक्रमण म्हणून दाखवण्यात येऊन हे अतिक्रमण निष्कासीत करणेस सांगितले आहे.त्यामुळे ते लोक कायमस्वरूपी बेघर होणार आहेत. तसेच ते प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पात्र ठरत असल्याने व सर्वांनसाठी घरे या योजने अंतर्गत बेघर व्यक्तींना निवास प्रयोजनेसाठी शासकीय योजनेनुसार पात्र ठरत आहेत. तरी कृपया सदर जमीन गट नं.१४२ मधील सर्व रहिवाशींचे निवासीघर नियमानुकूलीत करण्यात यावी या प्रकारचे निवेदन उपमुख्यमंत्री महोदयाना दिले आहे.
या अगोदरही ननवरे यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश भाऊ चिवटे यांच्या माध्यमातून माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनाही निवेदन दिले आहे,
यावेळी सुनील जाधव,संतोष मुरकटे,आण्णा सुरवसे,बापु जाधव आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल